शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

सत्यपाल महाराजांवर मुंबईत प्राणघातक हल्ला

By admin | Updated: May 17, 2017 00:13 IST

प्रसिद्ध सप्त खंजेरीवादक सत्यपाल महाराज चिंचोळकर यांच्यावर शुक्रवारी मुंबईत प्राणघातक हल्ला झाला. त्यात ते गंभीर झाले होते. त्यांच्यावर केईएम रुग्णालयात

आकोट (जि. अकोला) : प्रसिद्ध सप्त खंजेरीवादक सत्यपाल महाराज चिंचोळकर यांच्यावर शुक्रवारी मुंबईत प्राणघातक हल्ला झाला. त्यात ते गंभीर झाले होते. त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांना मंगळवारी रुग्णालयातून सोडण्यात आले. भोईवाडा पोलिसांनी हल्लेखोर कुणाल किशोर जाधव यास अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.अंधश्रद्वा, व्यसनमुक्ती आणि अनिष्ठ रुढी परंपरांविरुद्ध सत्यपाल महाराज प्रहार करतात. महाराष्ट्रातील एक अग्रणी प्रबोधनकार म्हणून त्यांची ओळख आहे. बुद्ध जयंतीनिमित्त मुंबईतील नायगाव (दादर) येथे त्यांचा शुक्रवारी कार्यक्रम झाला. कार्यक्रम संपल्यानंतर अनेकांनी महाराजांसोबत छायाचित्र काढले. या गर्दीत तोंडाला रुमाल बांधून किशोर जाधव हा युवक त्यांच्याजवळ पोहोचला. त्याने महाराजांच्या खांद्यावर हात ठेवत असल्याचे दाखवित चाकूने त्यांच्या पोटावर वार केले. सत्यपाल महाराजांनी तातडीने स्वत:ला सावरुन हल्ला चुकविण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर पळून जाण्याच्या तयारीत असताना उपस्थितांना त्याला पकडले. जखमी सत्यपाल महाराजांना लगेचच केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांनी भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून, आरोपी किशोर जाधवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत प्रबोधन करणारमी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारसरणीचा असून, संत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार राज्यभर करतो. समाजातील अंधश्रद्धा दूर होण्याकरिता समाज प्रबोधन करतो. अंधश्रद्धेला विरोध करणाऱ्या नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली. शुक्रवारी माझ्यावरही हल्ला झाला. या हल्ल्याने आपण विचलीत झालो नसून, शेवटच्या श्वासापर्यंत आपण महाराष्ट्रात प्रबोधन करुन समाजात जनजागृती करणार. - सत्यपाल महाराज, सप्त खंजेरीवादक