सोनई (जि. अहमदनगर) : भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई या शनिवारी सायंकाळी चार महिलांसह अचानक शनिशिंगणापूर देवस्थान परिसरात अवतरल्या. शनिचौथऱ्यासमोरील शनिपादुकांचे दर्शन घेऊन त्यांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी अत्यंत संयमपूर्वक देसाई यांना सरकारी वाहनात बसवून शनिशिंगणापूरच्या बाहेर काढून पुण्याच्या दिशेने रवाना केले. पोलीस वारंवार रोखत असल्याने त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. (वार्ताहर)
तृप्ती देसार्इंनी घेतले शनिपादुकांचे दर्शन
By admin | Updated: March 20, 2016 02:59 IST