शहरं
Join us  
Trending Stories
1
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
2
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
3
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
4
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
5
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
6
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
7
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
8
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
9
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
10
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
11
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
12
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
13
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
14
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
15
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
16
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
17
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
18
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
19
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
20
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?

बिझनेस विभागात सत्यनारायण नुवाल ठरले "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर"

By admin | Updated: April 11, 2017 22:17 IST

देशातील सर्वात मोठ्या स्फोटक उत्पादक सोलर समूहाचे सर्वेसर्वा सत्यनारायण नुवाल यांना यंदाचा बिझनेस विभागातील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कार जाहीर झाला आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 11 - देशातील सर्वात मोठ्या स्फोटक उत्पादक सोलर समूहाचे सर्वेसर्वा सत्यनारायण नुवाल यांना यंदाचा बिझनेस विभागातील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉक्टर एकनाथ खेडकर आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
शून्यातून विश्व निर्माण करणारे सत्यनारायण नुवाल आज देशातील अग्रणी उद्योगपतींपैकी एक आहेत. बिझनेस विभागात मोहिनी केळकर, ग्राईंड मास्टर, पुरुषोत्तम अग्रवाल अजंता फार्मा, गोकुळ दूध ( कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ), अर्जुनसिंह मोहिते पाटिल (वाईन उद्योग) यांना नामांकने जाहीर झाली होती. मात्र सर्वेसर्वा सत्यनारायण नुवाल यांनी बाजी मारली. मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये हा कार्यक्रम सुरु आहे. आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या "लोकमत"च्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे. 
 
युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
सत्यनारायण नुवाल यांचा अल्प परिचय - 
पैसे वाचविण्यासाठी बल्लारपूरच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर अनेक रात्री काढणारा तरुण देशातील सर्वात मोठा स्फोटक उत्पादक समूहाचा सर्वेसर्वा बनतो...सत्यनारायण नुवाल यांनी घेतलेली ही झेप थक्क करणारी आहे. गरिबीतून वर आलेल्या नुवाल यांनी स्वत:च्या कष्टाने सोलर समूहाला आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील प्रस्थापित केले. सुरक्षितता, गुणवत्ता आणि पर्यावरण रक्षण हा सत्यनारायण नुवाल यांचा मूलमंत्र आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारे सत्यनारायण नुवाल देशातील अग्रणी उद्योगपतींपैकी एक आहेत. देशात विस्फोटकांचे सर्वाधिक उत्पादन करणा-या कंपनीचे ते मालक आहेत. एक काळ होता, जेव्हा हातावर पोट घेऊन जगणारे सत्यनारायण नुवाल पडेल ते काम करण्यासाठी तयार होते. कधी त्यांनी विहिरी खणण्याचा व्यवसाय केला, तर कधी चक्क वेस्टर्न कोल फिल्ड्स येथे ठेकेदारांसाठी बांधकाम साहित्य वाहून नेण्याचे काम केले. खडतर दिवसांत तर त्यांनी प्रसंगी पोटाला चिमटा घेतला, पण जिद्द कधी हारली नाही. स्वप्न मोठे होते अन् यशाचे शिखर त्यांना खुणावत होते. चंद्रपूरमधील एका व्यापाराकडून त्यांनी विस्फोटकांचा परवाना त्यांनी भाडेतत्त्वावर मिळविला व व्यवसायाच्या माध्यमातून रसायन व विस्फोटक व्यवसायाच्या अनुभवाची शिदोरी जमा केली. तो व्यवसाय तर सोडावा लागला. मात्र, काही काळातच देशाचे मध्यस्थान असलेल्या नागपूरपासून त्यांच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली. १९८४ मध्ये इंडियन एक्सप्लोझिव्हचे वितरक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९९० पर्यंत त्यांची मेहनत व धडाडी यांच्या बळावर ते विस्फोटकांचे देशातील एक मोठे व्यापारी बनले. खाणउद्योग व पायाभूत सुविधा निर्माण करणा-या प्रकल्पांना औद्योगिक स्फोटकांचा पुरवठा करणारा सोलर समूह देशातील सर्वात मोठा स्फोटक उत्पादक आहे. कंपनीची उलाढाल १५०० कोटींच्या घरात असून, त्यांनी एका वर्षात ३०० कोटींचा नफा मिळवलेला आहे. नुवाल यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील व्यापार वाढविला व २० पेक्षा अधिक देशांना त्यांच्या समूहाकडून माल निर्यात करण्यात येतो. इतकेच काय, तर नायजेरिया, झांबिया व तुर्की या देशांत या समूहाने कारखानेदेखील टाकले आहेत. विस्फोटकांची गुणवत्ता सांभाळत असताना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याबाबतदेखील नुवाल नेहमी दक्ष असतात. हा त्यांनी कामाचा मूलमंत्रच बनविला आहे हे विशेष.
या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी "लोकमत"ने सुरू केलेल्या पुरस्काराची एव्हाना परंपरा झाली आहे. "लोकमत"च्या संपादकीय चमूने केलेले मंथन, जगभरातील कोट्यवधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून विजेत्यांची निवड साकारत आहे. १४ क्षेत्रांमधील प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या मान्यवरांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यात इतरांना प्रेरणादायी ठरेल, अशा कार्याचे बीज पेरणाऱ्यांचाही शोध या निमित्ताने घेतला गेला. समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या तसेच विकास आणि समृद्धीच्या वाटचालीत भर टाकलेल्या नानाविध क्षेत्रांमधील प्रतिभेचा आरसा म्हणून युपीएल प्रायोजित "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कारांकडे पाहिले जात आहे.
 
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
 
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. 
 
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
 
यंदा मोलाची भर...: आता चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" यातील एकंदर १३ कॅटेगरींसह "वैद्यकीय" क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
 
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४  कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
 
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लिक करा
lmoty.lokmat.com