शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरोधात भाजपा देतंय विरोधकांना बळ?; २ मतदारसंघात टाकला डाव

By प्रविण मरगळे | Updated: June 10, 2025 14:13 IST

एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांचे विरोधक पक्षात घेत भाजपाने आगामी राजकारणाची चुणूक दाखवून दिली आहे.

प्रविण मरगळे

मुंबई - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी पक्षात पक्षप्रवेशाची रिघ लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धवसेनेसह इतर पक्षांना खिंडार पाडले जात आहे. शिंदेसेना आपली ताकद वाढवत असल्याचे पाहून भाजपानेही नवा डाव टाकला आहे. भाजपाच्या या खेळीने विरोधकच नव्हे तर  महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेसेनेलाही डोईजड जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपा एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराविरोधात विरोधकांना बळ देतेय का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघातील सत्यजित पाटणकर आणि त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. पाटणकर कुटुंब कित्येक वर्ष शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत काम करत होते. या मतदारसंघात शंभूराज देसाई आणि पाटणकर हे कट्टर राजकीय विरोधक आहेत. अनेक निवडणुकीत पाटणकर-देसाई असा संघर्ष तिथल्या जनतेने पाहिला आहे. त्यातच सत्यजित पाटणकर यांना पक्षात घेऊन भाजपाने त्यांना बळ देण्याचं काम केले आहे. मुंबईत सत्यजित पाटणकर यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले उपस्थित होते. 

शरद पवारांचे निष्ठावंत पाईक म्हणून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची ओळख आहे. पवारांकडून नेहमीच पाटणकर कुटुंबाला ताकद देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काही काळ पाटणकरांनी काम केले. मात्र शंभूराज देसाई यांनी सलग तिसऱ्यांदा पाटणकर यांचा निवडणुकीत पराभव केला. त्यामुळे याच पाटणकरांना पक्षात घेऊन भाजपा सातारा जिल्ह्यात ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. 

साताऱ्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या मतदारसंघातही राजकीय उलथापालथ झाली आहे. या मतदारसंघात माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि वैभव पाटील हेदेखील भाजपात प्रवेश करत आहेत. विट्याचे माजी नगराध्यक्ष असलेले वैभव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते परंतु निवडणुकीत महायुतीकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. महाविकास आघाडीकडून त्यांनी निवडणूक लढवली. खानापूर मतदारसंघात विद्यमान आमदार सुहास बाबर आहे. दिवंगत अनिल बाबर यांचे ते चिरंजीव आहेत. या मतदारसंघातही बाबर विरुद्ध पाटील असा संघर्ष कित्येक वर्षाचा आहे. इथेही भाजपानेही वैभव पाटील यांना पक्षात आणत ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाShambhuraj Desaiशंभूराज देसाई