शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

साठे महामंडळ घोटाळ्याच्या फायली लंपास; दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 05:12 IST

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांशी संबंधित फायली महामंडळाच्या कार्यालयाचे सील तोडून पळविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

यदु जोशी मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांशी संबंधित फायली महामंडळाच्या कार्यालयाचे सील तोडून पळविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.सामाजिक न्याय विभागाच्या मालकीची दहिसरमधील हनुमान टेकडी भागात कल्याणी केंद्र ही चार मजली इमारत असून त्याच ठिकाणी २०१५ पर्यंत साठे महामंडळाचे कार्यालय होते. महामंडळाचे सर्व रेकॉर्ड याच इमारतीत ठेवण्यात आले आहेत. २०१२ ते २०१५ या काळातच महामंडळात कोट्यवधींचे घोटाळे झाले.साठे महामंडळाच्या कार्यालयातून फायली लंपास करण्यात आल्याची माहिती महामंडळाच्या चेंबूर येथील कार्यालयास अस्मिता संस्थेकडून त्याच दिवशी देण्यात आली.फायली पळविणाऱ्यांमध्ये साठे महामंडळातील घोटाळ्यांमधील मुख्य आरोपी आ. रमेश कदम यांचा भाऊदेखील होता, असे म्हटले आहे. आ. कदम या घोटाळ्याप्रकरणी सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत.इमारतीच्या तळमजल्यावर तीस वर्षे अस्मिता या सामाजिक संस्थेच्या वतीने मनोहर हरिराम चोगले अस्थिव्यंग-चिकित्सा व पुनर्वसन केंद्र चालविले जाते. या केंद्राच्या प्रमुख सुधा वाघ यांनी २८ एप्रिल रोजी घडलेल्या प्रकाराबाबत दहिसर पोलिसात तक्रार नोंदविली आहे.गुंडप्रवृत्तीचे चार-पाच जण इमारतीत आले. त्यांनी सील-कुलूप तोडून काही फायली, कागदपत्रे कारमध्ये भरणे सुरू केले. आमच्या केंद्राच्या कर्मचाºयांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी दादागिरी केली. तोडलेल्या कुलपांच्या जागी नवीन कुलपे व त्यावर जुजबी सील लावून ते कारने निघून गेले, असे या तक्रारीत म्हटले आहे. या सगळ्या प्रकाराचे व्हिडीओ रेकॉर्डिंग ‘लोकमत’च्या हाती आले आहे.