शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याच्या ‘शब्दा’स १२ वर्षांनंतर मिळाला मान; ३२ वर्षांनी त्याच स्टेडियममध्ये साहित्य संमेलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 07:40 IST

Marathi Sahitya Sammelan: ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान तब्बल ३२ वर्षांनंतर साताऱ्याला मिळाला. साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळाली. साताऱ्यात होणारे हे चौथे संमेलन ठरणार आहे. 

पुणे -  ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान तब्बल ३२ वर्षांनंतर साताऱ्याला मिळाला. साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळाली. साताऱ्यात होणारे हे चौथे संमेलन ठरणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष गुरूय्या स्वामी, कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह सर्व घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  या संमेलनासाठी औदुंबर, इचलकरंजी, कोल्हापूर आणि सातारा या संस्थांकडून निमंत्रणे आली होती. 

साताऱ्यात पहिल्यांदा १९०५ साली संमेलन तिसरे संमेलन १९०५ साली साताऱ्यात झाले होते. त्यानंतर १९६२ मध्ये ४४ वे, तर १९९३ साली ६६ वे संमेलन झाले होते. यंदाचे हे चौथे संमेलन असेल.  

३२ वर्षांनंतर पुनश्च शाहू स्टेडियमवरच संमेलन  साताऱ्यातील शाहू स्टेडियमवर यापूर्वी १९९३ साली ६६ वे संमेलन झाले होते. आता ३२ वर्षांनंतर पुन्हा एकदा याच स्टेडियमवर संमेलनाचे  आयोजन होण्याचा योग जुळून आला आहे. हे स्टेडियम १४ एकरमध्ये आहे. 

मार्गदर्शन समिती गठित संमेलनाच्या मार्गदर्शन समितीमध्ये प्रा. मिलिंद जोशी, गुरय्या स्वामी, सुनीताराजे पवार, विनोद कुलकर्णी, प्रदीप दाते, दादा गोरे आणि डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांचा समावेश आहे. 

साताऱ्याला ३२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. गेल्या १२ वर्षांपासून मसापची शाहूपुरी शाखा संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळावी, यासाठी पाठपुरावा करत होती.- प्रा. मिलिंद जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ   

टॅग्स :marathiमराठी