शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Satara Bus Accident: ‘त्या’ अपघाताची चौकशी त्रिसदस्यीय समितीद्वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:04 IST

सोशल मीडियावर होत असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे तब्बल ३0 बळी घेणाऱ्या पोलादपूर अपघाताची चौकशी करण्याचा निर्णय दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी घेतला आहे.

दापोली : सोशल मीडियावर होत असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे तब्बल ३0 बळी घेणाऱ्या पोलादपूर अपघाताची चौकशी करण्याचा निर्णय दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी घेतला आहे. त्यासाठी विद्यापीठाचे शिक्षण संचालक सतीश नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे.कृषी विद्यापीठाचे कर्मचारी विद्यापीठाची गाडी घेऊन सहलीसाठी जाताना झालेल्या अपघातात ३0 जण दगावले. प्रकाश सावंतदेसाई हे एकमेव बचावले आहेत.या अपघातानंतर मिळालेली माहिती, त्याबाबतची जबानी, वाहिन्यांवरून पुढे आलेले मुद्दे या साºयामध्ये विसंगती दिसत आहे. त्यामुळे नेमका अपघात कसा झाला, अपघातावेळी गाडी कोण चालवत होते यावर दापोलीत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्यामुळेच आता विद्यापीठाने पुढाकार घेत याची संपूर्ण चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. अपघातानंतर थोड्याच वेळात घटनास्थळी दाखल झालेले बाबासाहेब वाघमारे व दिलीप तळेकर यांचे काय म्हणणे आहे, हे तपासले जाणार आहे. त्यांच्या मोबाइलवरूनच आपण लोकांशी, पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असल्याचे सावंतदेसाई यांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीनेही माहिती घेतली जाणार आहे. विद्यापीठाचे शिक्षण संचालक सतीश नारखेडे यांच्याकडे या समितीचे अध्यक्षपद सोपवले असून उर्वरित दोघांची नावे अजून जाहीर झालेली नाहीत.मृतांना मदत जाहीरमुंबई : आंबेनळी घाटात मिनी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून ४ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. याशिवाय पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतूनही २ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येकी ६ लाखांचे अर्थसाहाय्य केले जाणार आहे.

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघात