शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये अर्थसंकल्पावर सेनेचा हल्लाबोल

By admin | Updated: March 1, 2017 02:40 IST

२०१७-१८ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पातील प्रशासनाच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या अनेक चुकांवर शिवसेनेने बोट ठेवले.

उरण : राज्य शासनाने मंजूर केलेली ५६ कोटी निधीची रक्कम ना जमा ना खर्चात समाविष्ट असलेल्या आणि स्थायी समितीची कोणतीही शिफारस नसलेल्या उरण नगरपरिषदेच्या २०१७-१८ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पातील प्रशासनाच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या अनेक चुकांवर शिवसेनेने बोट ठेवले. आधी चुका सुधारा, अशा सूचना करीत त्यानंतरच सुधारित अर्थसंकल्प मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी सेनेचे गटनेते गणेश शिंदे यांनी अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेतून केली. सेनेच्या आग्रही मागणीनंतर अर्थसंकल्पात सुधारणा करून मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.उनपमध्ये सत्तांतरानंतरची पहिलीच सर्वसाधारण सभा सोमवारी आयोजित केली होती. निर्विवाद भाजपाचे वर्चस्व असलेल्या या उरण नगरपरिषदेने आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेत कामकाज पत्रिकेवर ९७ विषय ठेवण्यात आले होते. कामकाजाला सुरुवात करण्याआधी उरण नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पावर चर्चेला सुरुवात झाली. मात्र, सेनेचे गटनेते गणेश शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेऊन सत्ताधारी आणि प्रशासनाच्या चुकांवर बोट ठेवत त्यांना चांगलेच धारेवर धरले. राज्य सरकारने उनपला ५६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. ५६ कोटी उनपच्या खात्यात जमा झाले आहे का? झाले असल्यास त्या निधीचा जमा व खर्चात का उल्लेख करण्यात आला नाही. अर्थसंकल्पासाठी स्थायी समितीची शिफारस जोडली नाही. चुकलेल्या तारखा आणि सत्ताधारी प्रशासनाने घातलेल्या घोळाबाबत सेनेचे गटनेते गणेश शिंदे यांनी सत्ताधारी आणि प्रशासनालाही म्हात्रे यांनी सहायक लेखापालांना अर्थसंकल्पाचे वाचन करण्याचे आदेश दिले. मात्र, लेखापालांच्या अर्थसंकल्प वाचनाला शिवसेनेने विरोध दर्शविला. यावर सेना-भाजपा गटनेते रवी भोईर यांनी अर्थसंकल्प मंजुरीसाठी टाकण्याची सूचना केली. यालाही सेनेने हरकत घेतली. अखेर वादळी चर्चेनंतर अर्थसंकल्पात आवश्यक सुधारणा करूनच अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर कामकाज पत्रिकेतील अनेक विषयांवर चर्चा झाली. प्रशासनाने सत्ताधारी आणि प्रशासनाने विकासकामे करावी, सेना उरण शहराच्या विकासकामात कोणताही अडथळा आणणार नाही. आवश्यक ते सहकार्यही करेल, अशी ग्वाहीही गटनेते गणेश शिंदे यांनी दिली. (वार्ताहर)