शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
2
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
3
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
5
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
6
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
7
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
8
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
9
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
10
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
11
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
12
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
13
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
14
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
15
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
16
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
17
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
18
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
19
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
20
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे

‘सारथी’च्या तब्बल २,७०० केंद्रांना दमडीही नाही; संगणक कौशल्य प्रशिक्षण ठप्प, राज्यभरातील तरुणांची कोंडी

By पोपट केशव पवार | Updated: October 29, 2025 15:45 IST

निधीच नसल्याने प्रशिक्षक केंद्रांनी प्रशिक्षण देणे बंद केले

पोपट पवारकोल्हापूर : मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या समाजातील नॉन-क्रिमीलेअर गटातील तरुण - तरुणींना संगणक आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या दृष्टीने स्वावलंबी बनवण्यासाठी सारथी संस्थेने छत्रपती संभाजी महाराज युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आखला खरा. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून राज्यभरातील २,७०० प्रशिक्षण केंद्रांना एक रुपयाचीही दमडी न दिल्याने राज्यभरात हा प्रशिक्षण कार्यक्रम ठप्प झाला आहे. प्रशिक्षण घेण्यासाठी राज्यभरातील हजारो तरुण उत्सुक आहेत. मात्र, निधीच नसल्याने प्रशिक्षक केंद्रांनी प्रशिक्षण देणे बंद केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो. यामध्ये संगणक कौशल्ये, संवाद कौशल्ये आणि इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर उमेदवारांना विविध संगणक संबंधित शाखांमध्ये नोकरीच्या संधी आहेत.यातून प्रशिक्षण घेऊन अनेक तरुणांनी डेटा एंट्री, डेटा मॅनेजमेंटसह विविध क्षेत्रांत रोजगार मिळवला आहे. सहा महिन्यांचा हा प्रशिक्षण कोर्स असून, एका विद्यार्थ्यामागे सरकारकडून २० ते २५ हजार रुपये संबंधित प्रशिक्षण केंद्राला दिले जातात. राज्यभरात अशी २,७०० केंद्रे आहेत. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून हा निधीच प्रशिक्षण केंद्रांना दिला नसल्याने हा प्रशिक्षण कार्यक्रम बंद पडला आहे.

विद्यार्थ्यांचे कोर्स अपुरेचसरकारने या प्रशिक्षण कार्यक्रमाचा निधी अचानक थकवल्याने अनेक विद्यार्थ्यांचे कोर्स अर्धवटच राहिले आहेत.

सारथीच्या या योजनेमुळे अनेकांना लाभ मिळत होता. मात्र, सध्या निधी नसल्याने हा कार्यक्रम बंद करणे हा गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. सरकारने एका चांगल्या संस्थेला अशा प्रकारे ‘खो’ घालू नये. लवकरात लवकर निधी द्यावा. - वसंतराव मुळीक, राष्ट्रीय उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ

English
हिंदी सारांश
Web Title : Sarathi's training centers face fund crunch, impacting youth skills development.

Web Summary : Sarathi's computer training program for Maratha youth stalled due to funding delays. 2,700 centers lack funds, leaving trainees in limbo. The program aims to provide skills for employment, but the government's financial hold-up has disrupted courses and left many students stranded.