शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

देशातील महापालिकांच्या सारथ्यासाठी ‘सारथी’ सज्ज

By admin | Updated: September 6, 2016 03:34 IST

महापालिका प्रशासनाचा कारभार गतिमान, तसेच पारदर्शी व्हावा, नागरी सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना सहज मिळावी

संजय माने,

पिंपरी-चिंचवड- महापालिका प्रशासनाचा कारभार गतिमान, तसेच पारदर्शी व्हावा, नागरी सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना सहज मिळावी, या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरू केलेल्या ‘सारथी’ हेल्पलाइन उपक्रमाची दखल केंद्र शासनाने घेतली. देशातील सर्व महापालिकांमध्ये ‘सारथी’ उपक्रम राबवावा, असे आदेश केंद्र शासनाच्या नगरविकास खात्याने दिले आहेत. त्यामुळे देशातील महापालिकांसाठी हा प्रकल्प सारथ्य करणार आहे. नळजोडसाठी अर्ज कोठे करायचा? बांधकाम परवाना कसा मिळेल? मिळकतकर कोठे भरायचा? असे नागरी सुविधांसंबंधीचे विविध प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होतात. त्याची तत्काळ उत्तरे मिळणारी सारथी हेल्पलाइन सुविधा पिंपरी-चिंचवडकरांसाठी प्रभावी सोल्युशन यंत्रणा ठरली. तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या संकल्पनेतून साकारलेला सारथी उपक्रम प्रशासन आणि नागरिक यांच्यातील सेतू बनला आहे.ई-गव्हर्नन्सचा अवलंब करून महापालिकेची विविध कार्यालये संगणकीकरणाने जोडून प्रशासकीय कामकाज गतिमान केले.त्यानंतर नागरिकांना माहिती उपलब्ध करून देण्याची यंत्रणा कार्यान्वित केली. २१९ महापालिकांमध्ये ‘सारथी’ होणार कार्यान्वित पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी सध्या पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असून, त्यांच्या संकल्पनेतून तीन वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये साकारलेल्या सारथी प्र्रकल्पाचे सादरीकरण केंद्रीय नगरविकास खात्याचे अतिरिक्त सचिव समीर शर्मा, सहसचिव नीरज मंडलोई यांच्यासमोर झाले. परदेशी यांनी सादरीकरण केलेला सारथी प्रकल्प आवडल्याने केंद्रीय नगरविकास खात्याचे अतिरिक्त सचिव एमपीएस दारा यांनी सर्व राज्याच्या प्रधान सचिवांना सारथी प्रकल्प राबविण्याचे आदेश दिले. २२ आॅगस्ट २०१६ला दिलेल्या या आदेशामुळे देशातील २१९ महापालिकांमध्ये हा प्रकल्प राबविण्याची प्रकिया सुरू होणार आहे. मोबाइल अ‍ॅपद्वारे सेवा...मोबाइल अ‍ॅप्स अ‍ॅप्लिकेशनद्वारे महापालिकेशी संबंधित कामे नागरिक घरबसल्या करू शकतील. अशा स्वरूपाचे ‘मोबाइल अ‍ॅप्स’ पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केले असून, मोबाइलच्या क्लिकवर त्यांना सहज माहिती मिळणार आहे. हे या महापालिकेने लोकाभिमुख सेवेसाठी उचललेले पुढचे पाऊल आहे.