शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

युतीने उमदेवारी नाकारल्यास अपक्ष रिंगणात उतरणार: संतोष माने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 17:43 IST

युतीच्या जुन्या फार्मुल्यानुसार गंगापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. मात्र मागच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना वेगवेगळे लढल्यानंतर गंगापूरमध्ये भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब हे निवडणून आले होते.

मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. तर भाजप- शिवसेनेची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील भाजपच्या ताब्यात असलेल्या गंगापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने केलेल्या दाव्यामुळे राजकीय वातारण तापले आहे. मतदारसंघात शिवसेनेचा जनसंपर्क पाहता भाजपचा उमदेवार निवडून  येणे शक्य नाही, त्यामुळे हा मतदारसंघ सेनेला सोडण्याची मागणी युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी संतोष माने यांनी केली आहे. अन्यथा सेनेला जय महाराष्ट्र करून अपक्ष लढण्यासाठी आपण तयार असल्याचा खुलासा सुद्धा माने यांनी केला आहे.

युतीत आगामी विधानसभा जागावाटपाचा पेच कायम असतानाच, गंगापूर मतदारसंघात राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. शिवसेनेचे माजी आमदार अण्णा साहेब माने यांचे पुत्र आणि युवा सेनेचे नेते संतोष माने यांनी गंगापूर मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची मागणी केली असून, अन्यथा थेट अपक्ष रिंगणात उतरणारा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे जागावाटप आधीच युतीत बिघाडी झाली असल्याची चर्चा आहे.

युतीच्या जुन्या फार्मुल्यानुसार गंगापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. मात्र मागच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना वेगवेगळे लढल्यानंतर गंगापूरमध्ये भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब हे निवडणून आले होते. तर दुसरीकडे, युतीचे विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघात फेरबदल होणार नसल्याचे जलसंपदा मंत्र गिरीश महाजन यांनी आधीच स्पष्ट केल्याने, ह्या वेळी भाजपकडे हा मतदारसंघ राहणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

मात्र, गंगापूर मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठी आहे. ग्रामीण भागात आमदार बंब यांचा जनसंपर्क नसल्याने, या ठिकाणी सेनेचाच उमेदवार निवडणून येऊ शकतो असा दावा संतोष माने यांनी केला आहे. शिवसेनेला यावेळी जागा सोडली नाही तर आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचा दावा सुद्धा माने यांनी केला आहे.तर लोकसभा निवडणुकीत भाजप आमदार बंब यांनी युतीच्या उमदेवार विरोधात काम केला असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी लावला.