शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

धोतराच्या पायघड्या अन् मेढ्यांचे रिंगणाने तुकोबांच्या पालखीचे स्वागत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 20:42 IST

काटेवाडी परिसरातील भाविकांनी काटेवाडी फाट्यावर पालखीच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी केली होती.

ठळक मुद्देइंदापूर तालुक्यात प्रवेश : पताका, रांगोळ्यांच्या भक्तिमय वातावरणात रंगला सोहळा 

काटेवाडी :  संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सकाळी बारामती येथून मार्गस्थ झाला. वाटचालीत मोती, आर्या बाग, बांडलवाडी पिपळी, लिमटेक येथे ग्रामस्थानी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले. गावात ठिकठिकाणी कमानी उभारल्या होत्या. पताका, रांगोळ्यामुळे अधिकच भक्तिमय वातावरण झाले होते. त्यानंतर पालखी काटेवाडीच्या दिशेने निघाली. काटेवाडी परिसरातील भाविकांनी काटेवाडी फाट्यावर पालखीच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी केली होती.

शालेय विद्यार्थिनींनी पालखीचे लेझीम, बँड वाजून पालखीचे स्वागत केले.यावेळी पार्थ पवार, जयश्री पवार उपस्थित होते.पालखी सोहळा काटेवाडी गावात जाताना परीट समाजाकडून धोतराच्या पायघड्या घालून स्वागत करण्याची परंपरा आहे. अनेक वर्षांपासूनची परंपरा सुरू आहे. संत गाडगे महाराजांच्या शिकवणुकीतून परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. काटेवाडीच्या वेशीजवळ आल्यानंतर पालखी काटेवाडीच्या ग्रामस्थांनी खांद्यावर घेतली. त्या वेळी पायघड्या घालून पालखीचे स्वागत करतात. या वेळी घरांबाहेर रांगोळ्यांच्या पायघड्याही घालण्यात आल्या होत्या. पार्थ पवार यांनी पालखी खांद्यावर घेतली. पालखी दर्शनासाठी परिसरातील भावीक आले होते. त्यानंतर विसावा झाला व गाव जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. जेवण झाल्यानंतर वारकºयानी  शेतविहारात आराम केला.भवानीनगर येथे पालखी सोहळ्याचा इंदापूर तालुक्यात प्रवेश झाला. आज पालखी सणसर येथे मुक्कामी असणार आहे. गुरुवारी सकाळी निमगावकेतली ला मार्गस्थ होणार आहे...............काटेवाडीच्या अंगणी मेंढ्या धावल्या रिंगणीपायघड्या धोतराच्या झाला गजर हरी नामाचा...विसाव्यानंतर ‘ज्ञानदेव माउली तुकाराम’चा जयघोष आणि टाळ मृदंगाचा गजर अशा वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मेंढ्यांचे पहिले गोल रिंगण काटेवाडीत पार पडले. रिगणं पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. 

रिंगणात पाचशे मेंढ्या     या रिंगणाच्यावेळी मध्यभागी पालखी ठेवण्यात येते पाचशे मेंढ्या पालखीभवती सोडतात त्या पालखीस पूर्ण पालखीस प्रदक्षिणा घालतात  यावेळी  वारकऱ्यांमधून तुकाराम महाराज की जय, जय हरी चा गजर मोठमोठ्याने होत  होता. वारकरी फुगड्या खेळत होते अभंग म्हणत होते. गात नाचत होते. पूर्ण परिसर हा तुकाराम महाराजाच्या नामाने नाहून निघाला. त्यानंतर सोहळ्याची पुन्हा वाटचाल सुरू झाली. 

टॅग्स :BaramatiबारामतीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारी