पुणे : मुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी सध्या शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात येरवडा कारागृहाबाहेर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याची सुटका २७ फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. तथापि, या वृत्ताला विभाग अथवा कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी मात्र दुजोरा दिला नाही. मुंबई बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. तो २१ मे २०१३ रोजी येरवडा कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी आला. त्याने यापूर्वी १८ महिन्यांची शिक्षा भोगली आहे. त्याची शिक्षा मार्च महिन्यात संपणार असून या काळातच तो कारागृहाबाहेर येणार असल्याचे कारागृह प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्याला २७ फेब्रुवारी रोजी शिक्षा संपवून सोडण्याचे आदेश राज्य शासनाकडून अद्यापतरी प्राप्त झालेले नसल्याचे अतिरिक्त महासंंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले.
संजय दत्त फेब्रुवारीअखेर कारागृहाबाहेर ?
By admin | Updated: January 7, 2016 02:45 IST