शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

सॅनिटरी नॅपकिन्सची ‘ग्रीनडिस्पो’ने विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 04:46 IST

नीरी व इतर संस्थांनी बनविली इलेक्ट्रॉनिक्स भट्टी; एका तासात ३० ते ६० पॅडचे प्रदूषणमुक्त डिस्पोजल

- निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात दर महिन्याला एक अब्ज सॅनिटरी नॅपकिन्सचा कचरा निर्माण होतो, मात्र या धोकादायक कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत असलेले अज्ञान तेवढेच उदासीन करणारे आहे. खरं तर या कचºयाचा बायोमेडिकल (जैविक) कचºयात समावेश होतो. पण त्याची विल्हेवाट सामान्य कचºयाप्रमाणे लावली जाते आणि यातून पर्यावरण आणि आरोग्याचेही धोके निर्माण झाले आहेत. यावर वर्षभराच्या परिश्रमानंतर राष्टÑीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) ‘ग्रीनडिस्पो’ ही पर्यावरणीय आणि ऊर्जा कार्यक्षम विद्युत सॅनिटरी पॅड भट्टी तयार केली आहे. ही भट्टी किफायतशीर आणि प्रदूषणमुक्त असल्याचा दावा नीरीच्या संशोधकांनी केला आहे.

महिलांचे अंदाजे ३२ प्रजोत्पादन वर्ष गृहित धरले जातात व या विशिष्ट वेळी मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना ८ ते १२ नॅपकिन्सची आवश्यकता असते. म्हणजे एक महिला एकूण सरासरी ४,५०० नॅपकिन्सचा वापर करते. भारतात महिन्याला अंदाजे १ अब्ज व वर्षाला अंदाजे १२ अब्ज नॅपकिन्सचा वापर होतो.मासिक पाळीदरम्यान आरोग्यदायी नॅपकिन्सच्या वापराबाबत वाढलेली जागरुकता चांगले संकेत आहेत. मात्र नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्याबाबत उदासीनता दिसून येते. हा जैविक कचरा असल्याने त्यानुसार त्याची विल्हेवाट लावणे अत्यावश्यक आहे. कचºयाची अयोग्य प्रकारे विल्हेवाट लावणे अत्यंत धोकादायक असल्याचे आरोग्य संस्थेचे म्हणणे आहे. त्यातून आजार उद्भवू शकतात. त्यावर उपाय शोधण्याचे आव्हान मागील वर्षी नीरीने स्वीकारले. नीरीसह हैदराबादच्या इंटरनॅशनल अ‍ॅडव्हान्स रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटलर्जी अ‍ॅन्ड न्यू मटेरियल्स (एआरसीई) तसेच सोब्बाल एरोथेरॅमिक्सच्या संयुक्त विद्यमाने वर्षभराच्या संशोधन व यशस्वी प्रयोगानंतर ‘ग्रीनडिस्पो’ या आधुनिक विद्युत भट्टीची निर्मिती करण्यात आली आहे. या दोन्ही संस्थांनी मिळून त्याचे पेटंटही घेतले आहे.भट्टी चेंबरमध्ये ५ ते १५ पॅड टाकून १५ मिनिटांत दहन करणे, म्हणजे तासाला ३० ते ६० पॅड दहन करण्याची क्षमता ग्रीनडिस्पोमध्ये आहे. कमी ऊर्जा वापर व अधिक तापमान वाढीवर या यंत्रात भर दिला आहे. विविध चाचण्या करून हा प्रयोग यशस्वी करण्यात आल्याचे नीरीचे संशोधक डॉ. नितीन लाभशेटवार यांनी सांगितले.ग्रीनडिस्पोचे वैशिष्ट्ययात इंधनाचे अनुकूल प्रमाण कायम राखले जाते. सॅनिटरी नॅपकिन्सच्या ज्वलनाला आवश्यक ८०० डिग्रीपेक्षा अधिक तापमान प्राथमिक दहन चेंबरमध्ये निर्माण करून पॅडमधील उच्च सेल्यूलोज पदार्थ जाळून निर्जंतूक करतो. पॉलिमेरिक व क्लोरिनयुक्त रासायनिक पदार्थांच्या प्रदूषणमुक्त ज्वलनासाठीत्यात सुधारणा करून चेंबरमध्ये १००० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान वाढ करून ते नियंत्रित करण्याची क्षमता यात आहे.