शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नोबेलच्या यशात सांगलीच्या सुपुत्राचे योगदान, संदीप कलेढोणकर यांच्या जिद्दीला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 07:39 IST

‘क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी’ या संशोधनासाठी जॅक्स दुबोशे, जोआखीम फ्रँक व रिचर्ड हेंडरसन या तिघा शास्त्रज्ञांच्या चमूला या वर्षीचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

इस्लामपूर (जि. सांगली) : ‘क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी’ या संशोधनासाठी जॅक्स दुबोशे, जोआखीम फ्रँक व रिचर्ड हेंडरसन या तिघा शास्त्रज्ञांच्या चमूला या वर्षीचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील जोआखीम फ्रँक यांना संशोधनात सहकार्य करणाºया १४ जणांच्या गटात वाळवा तालुक्याच्या रेठरेहरणाक्षमधील डॉ. संदीप कलेढोणकर या शास्त्रज्ञाचा समावेश होता.विषाणू किंवा तत्सम सूक्ष्म अशा जैव रासायनिक पदार्थांचे आहे त्या स्थितीत निरीक्षण करण्याचे तंत्र विकसित झाल्यावर बायोकेमिस्ट्री क्षेत्रात क्रांती घडली. आता त्यापुढे जाऊन जिवंत स्थितीतील जैव रासायनिक रेणूंचे निरीक्षण रंगीत व त्रिमिती अवस्थेतही करणे शक्य झाले आहे. जैव रासायनिक प्रक्रिया बिघडल्यावरच शारीरिक व्याधी जडतात. मानवी शरीरातील व्याधींच्या या कारणांचा अभ्यास करणे, जैव रासायनिक रेणूंचे निरीक्षण करणे, तसेच विषाणूंचा हल्ला नेमका कसा होतो याचे प्रत्यक्ष चित्रण क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी या तंत्राने पाहणे शक्य झाले आहे. या तंत्रामुळे भविष्यात कर्करोग, अल्झायमर यासारख्या व्याधींवर औषध निर्मिती करणेही सुलभ होणार आहे.उणे १५0 अंश सेल्सिअस तापमानाला रेणू गोठवून त्याचे निरीक्षण करण्याचे तंत्र विकसित करण्याचे अद्भुत कार्य जोआखीम फ्रँक व त्यांच्या सहकारी शास्त्रज्ञांनी केले आहे. त्यांच्या या संशोधन कार्यात डॉ. संदीप कलेढोणकर यांनी योगदान दिले आहे. स्वीडन येथील स्टॉकहोममध्ये १२ डिसेंबर रोजीनोबेल पुरस्कार वितरण सोहळाहोणार आहे. या कार्यक्रमात डॉ. जोआखीम फ्रँक यांच्यासमवेत डॉ. संदीप कलेढोणकर उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कारSangliसांगली