मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख मुकुंदराव पणशीकर यांचे शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी आठ वाजता सुमारास शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.दादरच्या शिवाजी उद्यान सायंशाखेचे स्वयंसेवक असलेले पणशीकर बी.पी.एड.ची पदवी घेतल्यानंतर १९६२ सालापासून संघाचे प्रचारक म्हणून कार्यरत होते. शनिवारी सकाळी आठसाडे आठ वाजण्याच्या सुमारास लखनौहून मुंबईत पोहोचल्यावर त्यांना कुर्ला टर्मिनसवर अस्वस्थ वाटू लागले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव लोअर परळ येथील यशवंत भवन या संघाच्या कार्यालयात ठेवण्यात आले होते. त्यांच्या पाश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.मुंबईच्या सहकार, शिक्षण क्षेत्राचा आधारस्तंभ गमावलाराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख मुकुंदराव पणशीकर यांच्या निधनाने मुंबईच्या सहकार आणि शिक्षण क्षेत्राचा मोठा आधारस्तंभ गमावला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
संघप्रचारक मुकुंदराव पणशीकर यांचे निधन
By admin | Updated: November 7, 2015 22:31 IST