शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

राज्यात वाळूचे लिलाव सप्टेंबरमध्ये

By admin | Updated: March 18, 2016 02:10 IST

राज्यात रेती घाटांचे लिलाव विशिष्ट काळात होतात. त्यामुळे उर्वरित काळात वाळू उपलब्ध होत नाही. यातून काळा बाजार वाढतो. यावर उपाय म्हणून राज्य सरकार लवकरच वाळू

मुंबई : राज्यात रेती घाटांचे लिलाव विशिष्ट काळात होतात. त्यामुळे उर्वरित काळात वाळू उपलब्ध होत नाही. यातून काळा बाजार वाढतो. यावर उपाय म्हणून राज्य सरकार लवकरच वाळू धोरण तयार करीत आहे. यापुढे राज्यात सर्वत्र सप्टेंबर महिन्यात रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात पालघर जिल्ह्यातील वैतरणा सूर्या नदी व खाडीच्या पात्रात अवैध वाळूउपसा होत असल्याबाबतचा प्रश्न पास्कल धनोरे यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना खडसे म्हणाले, घाटांच्या लिलावात विलंब होतो. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जून ते फेब्रुवारीच्या काळात रेती उपलब्ध होत नाही. नव्या धोरणानुसार जूनमध्ये वाळू घाट निश्चित केले जातील. जुलै ते आॅगस्ट या काळात लिलावासाठी लागणाऱ्या हरित लवाद, पर्यावरण, प्रदूषण आदी परवानग्या घेतल्या जातील. संंबंधित विभागालाही या मुदतीत एनओसीवर निर्णय घ्यावा लागेल. आॅगस्टमध्ये लिलावाची प्रक्रिया पूर्ण करून सप्टेंबरमध्ये लिलाव केले जातील. वाळूउपसा १ आॅक्टोबरपासून सुरू होईल. तसेच सध्या पाच पट सरसकट दंड आकारला जातो. यापुढे नियम भंगाचे स्वरूप पाहून सरसकट पाच पट दंड न करता पाचपटीपर्यंत दंड आकारण्याची तरतूद केली जाईल. शेतकऱ्यांना मदतीसाठी कायद्यात बदल करणारबोगस बियाणे, खतांचा पुरवठा झाल्यामुळे अपेक्षित उत्पन्न न होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी केंद्र सरकारच्या कायद्यात बदल करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती राज्यमंत्री राम शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. योगेश गोलप यांनी कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांना बनावट सेंद्रिय खतांची विक्री झाली असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सांगत शेतकऱ्यांना भरपाई मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला. हरीश पिंगळे, वीरेंद्र जगताप यांनीही नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. यावर राज्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, चौकशीअंती मे. नवभारत फर्टीलायझर्स लि. हैदराबाद या कंपनीच्या नाशिक शहरातील तीन वितरकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. कंपनीच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अशा नुकसानीसाठी मदत देण्याची तरतूद केंद्राच्या कायद्यात नाही, असे सांगून शेतकऱ्यांना ग्राहक पंचायतीकडे दाद मागता येईल, असेही सुचविले. शासकीय बांधकामांना वाळू जे घाट लिलावात विकले गेले नाहीत तेथील रेती शासकीय दराने रॉयल्टी आकारून शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, स्मारके यांना तसेच लोकहिताच्या बांधकामांसाठी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.दगडापासून वाळू तयार करणाऱ्यांना रॉयल्टीत सूटनव्या धोरणात दगडापासून वाळू तयार करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. त्यांना रॉयल्टीमध्ये १०० टक्के सूट दिली जाईल. वीज दरात सवलत दिली जाईल, असेही खडसे यांनी स्पष्ट केले.