शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

..चक्क पोलीस ठाण्यातून पळविला वाळूचा ट्रक

By admin | Updated: April 20, 2015 13:31 IST

पोलीस अधिकार्‍याने पकडलेला वाळूचा ट्रक पोलीस ठाण्याच्या परिसरात आणला जातो आणि काही वेळाने राजकीय वरदहस्त असलेला वाळूमाफिया तो ट्रकच पळवून नेतो.

भुसावळ : पोलीस अधिकार्‍याने पकडलेला वाळूचा ट्रक पोलीस ठाण्याच्या परिसरात आणला जातो आणि काही वेळाने राजकीय वरदहस्त असलेला वाळूमाफिया तो ट्रकच पळवून नेतो.. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी घटना शनिवारी रात्री भुसावळात घडली. या घटनेसोबतच गुन्हेगारांवर असलेला पोलिसांचा उरला-सुरला धाकही संपला असून पोलीस दलाची अब्रूच वेशीवर टांगली गेली आहे. 
आता या घटनेची वाच्यता होऊ नये, यासाठी पोलीस विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, भुसावळातील बाजारपेठ ठाण्याच्या एका अधिकार्‍याने रविवारी मध्यरात्री गस्तीदरम्यान वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक (एम.एच.१९ झेड.५0४0) पकडला. 
संबंधिताकडे कुठलीही कागदपत्रे नसल्याने हाट्रक बाजारपेठपोलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आला. यानंतर राजकीय चक्रे फिरू लागली. मोठा वरदहस्त असलेल्या वाळूमाफियाने फौजदाराशीच अरेरावी करीत पोलीस ठाण्याच्या आवारातून चक्क जप्त केलेला ट्रकच पळवून नेला. रविवारी पहाटे पहाटे हा प्रकार घडला.
 
ट्रक लांबवल्याबाबत पोलीस उपअधीक्षक रोहिदास पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नाशिक येथे बंदोबस्तावर असल्याचे सांगण्यात आले. फौजदार आशिष शेळके यांच्याशी वारंवार संपर्कसाधल्यानंतर त्यांनी कामात आहे, नंतर बोलतो, असे सांगून भ्रमणध्वनी कट केला, तर पोलीस निरीक्षक सतीश देशमुख रजेवर असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
- या ट्रक चोरीप्रकरणी रात्री उशिरा बापूभाऊ बडगुजर यांच्या फिर्यादीवरुन गणेश पंडित सोनवणे (१९, रा.खेडी, आव्हाणे, ता.जळगाव) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पाच लाख सात हजारांच्या ट्रकसह वाळू लांबवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 
- कठोर कारवाईचे आदेश
वाळूची अवैधरीत्या वाहतूक वा चोरी होत असल्यास महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी कठोर कारवाईचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. मात्र या आदेशाच्या अंमलबजावणीचा प्रशासनाला जणू विसर पडला आहे. 
- जिल्ह्यातील गिरणा पात्रातून राजरोस वाळूची वाहतूक सुरू आहे. सूर्यास्तानंतर वाळू वाहतूक करता येत नाही. मात्रअसे असतानाही राष्ट्रीय महामार्गावरून अहोरात्र वाळूचे शेकडो ट्रक वाहतूक करीत असल्याचे चित्र आहे. आर्थिक-देवाण घेवाणीमुळे प्रशासनाने चुप्पी साधली आहे की काय?असा प्रश्नही उपस्थित होत आहे. प्रशासनाची सोयीस्कर चुप्पी !