शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्ग न झाल्यास नुकसानच!

By admin | Updated: May 29, 2017 05:10 IST

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचे चित्र बदलण्याची समृद्धी महामार्गात क्षमता आहे. तो न झाल्यास नुकसानच होणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचे चित्र बदलण्याची समृद्धी महामार्गात क्षमता आहे. तो न झाल्यास नुकसानच होणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करूनच त्यांच्या जमिनी राज्य सरकार घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे स्पष्ट केले.समृद्धी महामार्गाच्या एकूण ७०० किलोमीटरपैकी ६७० कि.मी.ची मोजणी झालेली आहे. मात्र, काहींचा जमिनी देण्यास विरोध आहे. अर्थात विरोध असलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे समाधान करूनच त्यांच्या जमिनी घेतल्या जातील, असे ते म्हणाले. नाशिकचा एकलहरे वीजप्रकल्प हलविण्याचे कारण नाही. प्रश्न वीजनिर्मितीचा नसून, विजेचे भाव कसे कमी करायचे व वितरण कसे करायचे, याबाबत विचार होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. संपाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करू१ जूनपासून शेतकरी संपावर जाणार असल्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काही शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. काही शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे. कृषिमंत्र्यांनी त्यांना चर्चेचे निमंत्रणही दिले आहे, परंतु शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे समाधान केले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विरोध करणाऱ्यांना केली अटकभगूरमध्ये समृद्धीबाधित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात निषेध करण्याचा प्रयत्न केला. तो पोलिसांनी उधळून लावला. शेतकऱ्यांना ताब्यात घेताना, पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.