लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणी सनातन संघटनेसह हिंदुत्ववादी संघटनांची चौकशी पोलिसांनी केली. अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेच्या कारभारातही अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. संस्थेला मिळालेला निधी, त्याचा विनियोग याचा तपास केल्यास डॉ. दाभोलकरांचे मारेकरी कोण आहेत, हे उघडकीस येईल, असा दावा ‘सनातन’चे पदाधिकारी शंभू गवारे यांनी पत्रकार परिषदेत केला.हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले, गोरक्षा समितीचे नितीन व्हटकर व गवारे यांनी पत्रकार परिषद घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कारभारावर आक्षेप नोंदवला. विशेष लेखापरीक्षण केल्यास अनेक बाबी पुढे येतील. डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी कोण, याचा शोध लागेल. आतापर्यंत हिंदुत्ववादी संघटनांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला होता, आता त्यांच्या संस्थेची, विश्वस्त, सदस्यांची कसून चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. चिंचवडमध्ये नुकतीच एक रॅली काढण्यात आली. त्या वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शहर पदाधिकारी राजेंद्र कांकरिया यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला.
‘अंनिस’च्या चौकशीची ‘सनातन’ची मागणी
By admin | Updated: July 11, 2017 00:26 IST