शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Samruddhi Mahamarg Biggest Benefit: समृद्धी महामार्गामुळे लुटालूट, दादागिरीपासून होईल सुटका; ट्रक चालक सरदारजी म्हणतो...ये रोड बडा चंगा है!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 11:08 IST

३५ ते  ४० टन वजनाची गाडी चालवितो, तेव्हा पाठीमागून येणारा दुचाकीस्वार, कारचालक यांना तत्काळ  ‘साइड’ हवी असते. थोडा जरी विलंब झाला तर...

साहेबराव नरसाळे/ अरुण वाघमोडेलोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : ‘ये रोड बडा चंगा है... बीच में कोई रुकावट नहीं. ट्रक चलाते समय बाईक, कारवालों की गालीगलोच, दबंगगिरी से बचेंगे और जहाँ भी जाना है वहा समयपर पहुचेंगे... भाई, इस रोड पर हमें अब इज्जत मिलेगी...’ असं समृद्धी महामार्गाबद्दल ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील ट्रकचालक सरदूर सिंग भरभरून बोलत होता. 

ट्रकचालक सरदूर सिंग (ग्वाल्हेर)  भेटले. ‘सरदारजी, कैसा है ये महामार्ग?’ या प्रश्नावर सरदारजी भरभरून बोलायला लागले. ‘भाई, पैंतीस, चालीस साल से ट्रक चला रहा हूँ... भारत का हर एक बडा हायवे देखा है लेकिन ये सिमेंट का समृद्धी व्हायवे बहोत बढीया है. यहां काेई रुकावट नहीं...’ ३५ ते  ४० टन वजनाची गाडी चालवितो, तेव्हा पाठीमागून येणारा दुचाकीस्वार, कारचालक यांना तत्काळ  ‘साइड’ हवी असते. थोडा जरी विलंब झाला तर काहीजण थेट शिवीगाळ करतात. काहीवेळा तर थेट ट्रक अडवून हात उचलण्याचाही प्रयत्न करतात. अनेकदा आमच्या वाहनाच्या काचाही फोडल्या आहेत. आता या महामार्गावर आमची सर्व त्रासातून सुटका झाली आहे. सरकारने शिर्डी ते मुंबई रोडही लवकरच तयार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

‘दाब क्लच, बदल गीअर’मधून सुटका  या महामार्गावर अडथळे नसल्याने ‘दाब क्लच, बदल गीअर, फिरव स्टिअरिंग’ यामधून वाहनचालकांची सुटका झाली आहे. तथापि या महामार्गावर कुत्र्यांचा सर्वाधिक अडथळा आहे. तसेच वानर, हरणांचे कळपही रस्त्याच्या कडेला लावलेल्या संरक्षक कठड्यावरून उड्या मारून पळताना दिसतात. 

शेतातून रस्ता गेल्याने आम्हाला सरकारने चांगला मोबदला दिला. या महामार्गावर अनेक प्रकल्प उभे राहत आहेत. हे प्रकल्प कार्यान्वित होतील, तेव्हा परिसरातील विकासाला चालना मिळेल.- दौलत माळी, शेतकरी सवंत्सर, कोपरगाव शेतकरी

महामार्गावरून खाली उतरण्यासाठी ठरावीक ठिकाणीच रस्ते आहेत. त्यामुळे या महामार्गावर निश्चित ठिकाणी असलेल्या हॉटेलमध्येच प्रवासी जाणार आहेत. आमच्यासारख्या छोट्या टपरीवाल्यांनाही संधी मिळावी.- रवींद्र ठाकरे, हॉटेलचालक, वडगाव (ता. हिंगणा)

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग