शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

Samruddhi Mahamarg Video: उद्घाटनाआधीच समृद्धी महामार्गाची कमान कोसळली; एकाचा मृत्यू, सोहळा पुढे ढकलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 22:00 IST

Samruddhi Mahamarg accident, one Death: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रक काढले आहे. हा सोहळा किमान दीड ते दोन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

नागपूर : मुंबईसह नागपूरपर्यंतच्या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या उद्धाटनाआधीच मोठी दुर्घटना घडली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण लांबणीवर टाकण्यात आले आहे. या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तर दोघे जखमी झाले आहेत. 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रक काढले आहे. हा सोहळा किमान दीड ते दोन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. या महामार्गावर वन्यजीवांसाठी ओव्हरपास बांधण्यात आले आहेत. त्यापैकी एक सोळाव्या नंबरचा ओव्हरपासचा आर्च कोसळला आहे. यामुळे हे काम पुढील पाच-सहा दिवसांत ते काम पूर्ण होणे अशक्य आहे. तसेच तज्ज्ञांनी आता वन्यजीव उन्नत मार्गासाठी नव्या पद्धतीचे सुपर स्ट्रक्चर बनवण्याचे सुचविले आहे. त्यासाठी आणखी दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे.

यामुळे नागपूर ते सेलुबाजार दरम्यान समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा किमान दीड ते दोन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण 2 मे रोजी करण्याचे जाहीर करण्यात आले होते. यावरून राजकारणही सुरु झाले होते. गर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सेलुबाजार ते वर्धा जिल्ह्यापर्यंत समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची हवाई पाहणीही केली होती. 

समृद्धी तयार, पण त्यावर पोहोचणेच कठीण; आणखी १८ महिने लागण्याची शक्यतानागपूर-मुंबई हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम नागपूर जिल्ह्यात पूर्ण झाले आहे. लोकार्पणाच्यापूर्वीच वाहनेही धावू लागली आहेत. दरम्यान, लोकार्पणाची तयारीही सुरू झाली आहे. परंतु समृद्धी महामार्ग जेथून सुरू होतो, त्या शिवमडका येथील एन्ट्री पॉईंटपर्यंत पोहोचणे मात्र कठीण काम आहे. ती समस्या लवकर संपण्याची शक्यताही नाही. कारण शिवमडकापर्यंत पोहोचण्याचा रस्ता पूर्ण व्हायला अजून १८ महिने लागण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग