शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

समीरची ब्रेन मॅपिंग, नार्को तपासणी करणार

By admin | Updated: September 25, 2015 02:57 IST

पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला संशयित आरोपी समीर गायकवाड याची लवकरच ब्रेन मॅपिंग आणि नार्को तपासणी करण्यात येणार

कोल्हापूर : पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला संशयित आरोपी समीर गायकवाड याची लवकरच ब्रेन मॅपिंग आणि नार्को तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.समीरला अटक केल्यानंतर त्याने कोल्हापूर पोलिसांना तपासात अपेक्षित सहकार्य केलेले नाही.त्याची आठ दिवसांची पोलीसकोठडी बुधवारी संपली. त्यामुळे त्याला बुधवारी न्यायालयातहजर केले असता त्याची पोलीस कोठडी शनिवारपर्यंत वाढविण्यात आली. गेल्या आठ दिवसांत समीरकडे तपास करताना पोलिसांच्या हाती त्याचे मोबाइलवरील संभाषण हाच ठोस मुद्दा मिळाला आहे. त्याने संकेश्वर येथे कट रचल्याबद्दलही पोलीस माहिती घेत आहेत; पणतो पोलिसांना तपासकामात अपेक्षित सहकार्य करीत नसल्याने त्याची लवकरच नार्को आणि ब्रेन मॅपिंग तपासणी करण्यात येणार आहे; पण त्यासाठी समीरची मान्यता घेणे बंधनकारक आहे.याशिवाय गुजरात येथील गांधीनगर फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने त्याचे व्हाईस रेकॉर्डिंग, संभाषण, कॉल डिटेल्स तसेच त्याच्या वर्तणुकीबाबत तपासणी केली होती. त्याचाही अहवाल येत्या दोन दिवसांतयेण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अहवाल आल्यानंतरच त्याच्या कॉलवरील संभाषणांचा बऱ्यापैकी उलगडा होईल.सांगली येथील त्याच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यात जप्त केलेल्या अनेक कागदपत्रांसह सुमारे ३१ मोबाइलच्या सीमकार्डांबाबतही तपासणी करण्यात येणार आहे. ही सीमकार्ड सांगली, मुंबई, ठाणे, पनवेल, गोवा, बेळगाव (कर्नाटक) येथील काही व्यक्तींच्या नावे असल्याचेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहेत. या सर्वांना कोल्हापुरात बोलावून घेऊन त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे. (प्रतिनिधी)