शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजे भोसलेंच्या पाठिशी संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:46 IST

उदयनराजे भोसलेंच्यापाठिशी संभाजीराजे

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : खंडणी प्रकरणात खासदार उदयनराजेंना अटक होण्याची शक्यता असताना कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे हे उदयनराजेंच्या पाठिशी उभे राहिलेत. त्यांनी उदयनराजेंच्या समर्थनार्थ फेसबुकवर पोस्ट लिहिलीय. या पोस्टमध्ये संभाजीराजेंनी म्हटले आहे की, "काल रात्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी माझी चर्चा झाली.ज्या अडचणीचा ते सामना करत आहेत त्या अडचणीत कोल्हापूर छत्रपती घराणे पुर्णपणे त्यांच्यासोबत आहे. कुठल्याही संकटाचा सामना कसा करायचा हे छत्रपती घराण्याला चांगले माहित आहे. संकट ही आम्हाला नवीन नाहीत.लवकरच ते यामधून बाहेर येतील याचा मला पूर्ण विश्वास आहे." याआधी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस खासदार राजीव सातव यांनीही उदयनराजेंना पाठिंबा दिलाय.उदयनराजेंच्या भूमिकेकडे लक्षखंडणी आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेले खासदार उदयनराजे भोसले हे सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करणार की, स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर होणार याकडे तमाम सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे.कृतीदल सतर्क !उदयनराजे साताऱ्यात येऊन गेल्यानंतर जलद कृती दलाची तुकडी सतर्क झाली आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याने मुख्यालयात राखीव पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उदयनराजे पुण्यात असले तरी त्यांच्यावर साताऱ्यातील गोपनीय विभाग त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे.