शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवला तर गाठ माझ्याशी आहे; संभाजीराजे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 4:46 PM

शिवरायांवर आधारित चित्रपटांमध्ये चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप संभीजीराजे छत्रपती यांनी केला आहे.

मुंबई: गेल्या काही वर्षांपासून मराठीत छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक ऐतिहासिक चित्रपट आले आहेत. या चित्रपटांमध्ये अनेकदा इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करण्यात आलाय. याच मुद्द्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. आज पत्रकार परिषद घेऊन चुकीचा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना चांगलाच दम दिला.

...तर गाठ माझ्याशी आहेयावेळी संभाजीराजे महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' आणि सुबोध भावे अभिनीत 'हर हर महादेव' चित्रपटावर चांगलेच संतापले. 'हे काय मावळे आहेत, यांच्या डोक्यावर पगडतरी आहे का? पगडी काढणे म्हणजे शोक संदेश असतो. हे असे मावळे असतात का? ड्रामेटायझेशन दाखवण्याच्या नावाखाली काहीही करणार का? असे चित्रपट काढणार असाल तर सरकारने सेंसॉरवर ऐतिहासिक समिती स्थापन करावी. चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला तर गाठ माझ्याशी आहे,' असा इशारा संभाजीराजेंनी यावेळी दिला.

मी त्यांना आडवा जाणार

ते पुढे म्हणाले, 'आपण सर्वजण मराठे आहोत. त्या काळात मराठा जात नव्हती. मराठा म्हणजे सर्व मराठी माणसं. चित्रपटात काहीही दाखवले जात आहे. माझी सर्वांना विनंती आहे, महाराजांचा इतिहास वाचावा. माझा छत्रपतींच्या घराण्यात जन्म झाला आहे, ही माझी जबाबदारी आहे. छत्रपतींच्या इतिहासाची मोडतोड केली, तर खपवून घेणार नाही. मी तो हर हर महादेव चित्रपट पाहिला नाही. पण, माझ्याकडे रिपोर्ट आली, त्यात इतिहासाची मोडतोड केली आहे. अशाप्रकारचे चित्रपट पुन्हा समोर आले, तर मी त्यांना आडवा जाणार. 

चांगला चित्रपट काढा, शाबसकी देईनसंभाजीराजे पुढे म्हणतात की, 'मी कोणालाही धमकी देत नाहीये. मी यापूर्वी कोणाला बोललो नाही, पण आता बोललोय. या घराण्यात माझा जन्म झाला, त्यामुळे यापुढे असे चित्रपट काढू देणार नाही. लोकांना विनंती आहे की, त्यांनी असे चित्रपट पाहू नये. मी सेंसॉर बोर्डालाही पत्र देणार आहे. इतिहासाची मोडतोड होत असताना, सेंसॉर बोर्डाने परवानगी दिलीच कशी, हे मी विचारणार आहे. चांगला चित्रपट काढला, तर मी स्वतः त्यांना शाबासकी देईल,' असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMahesh Manjrekarमहेश मांजरेकर Subodh Bhaveसुबोध भावे