शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

सलमानच्या निकालाने पोलिसांच्या प्रतिमेला धक्का

By admin | Updated: December 11, 2015 02:07 IST

‘हिट अँड रन’ प्रकरणामध्ये अभिनेता सलमान खानला उच्च न्यायालयाने निर्दोष सोडल्याने मुंबई पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. कोर्टाने त्याला निर्दोष सोडण्याबरोबरच पोलिसांच्या तपास कामाबाबत ओढलेले

जमीर काझी,  मुंबई‘हिट अँड रन’ प्रकरणामध्ये अभिनेता सलमान खानला उच्च न्यायालयाने निर्दोष सोडल्याने मुंबई पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. कोर्टाने त्याला निर्दोष सोडण्याबरोबरच पोलिसांच्या तपास कामाबाबत ओढलेले ताशेरे अधिक गंभीर असल्याने, त्याचा पोलिसांच्या प्रतिमेवर परिणाम होणार आहे. त्यामुळेच याबाबत पोलिसांनी सावध पवित्रा घेतला आहे. पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्यासह एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने निकालाबाबत भाष्य करण्याचे टाळले. कधी काळी इंग्लंडच्या बॉबी व स्कॉटलंड पोलिसांशी तुलना केली जाणाऱ्या मुंबई पोलीस दलाला, गेल्या तीन महिन्यांत ‘हाय प्रोफाइल’ केसमध्ये लागोपाठ बसलेली तिसरी चपराक आहे. न्या. जोशी यांनी याप्रकरणात सलमान खानचा तत्कालीन बॉडीगार्ड कॉन्स्टेबल रवींद्र पाटील याच्या साक्षीबाबत आक्षेप नोंदविताना पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यापासून पंचनामा आणि पुरावे गोळा करण्याच्या पद्धतीतील विसंगतीवर बोट ठेवले. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ६४ साक्षीदार असताना, केवळ १७ जणांनाच का न्यायालयात हजर करण्यात आले? त्याचप्रमाणे गायक कमाल खानला साक्षीसाठी का बोलविण्यात आले नाही? त्यामागील तपास अधिकाऱ्यांची भूमिका साशंकता निर्माण करणारी आहे. शीना बोरा आणि राजन या दोन मोठ्या प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आल्याने, मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवर मोठा परिणाम झाला होता. त्यातच आता उच्च न्यायालयाने सलमान खानच्या प्रकरणात मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढले. >> सलमानला वाचवणारे कायद्याचे हात!हिट अँड रन प्रकरणातून सलमानला मुक्त करण्यात त्याच्या पाठी उभ्या असलेल्या कायदेतज्ज्ञांची मोठा हात आहे. सलमानसाठी पडद्यामागची सूत्रे हलविणारे वकिलांची ही टीम....1 उच्चभ्रू वर्गातील व्यक्तींच्या कायदेशीर बाबी हाताळणारे भारताचे माजी सॉलिसीटर जनरल हरीश साळवे यांनी या प्रकरणी सलमान खानचे प्रतिनिधित्व केले. साळवे यांनी सेशन कोर्टाच्या आॅर्डरनंतर तत्काळ मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आणि ३० हजारांच्या बाँडवर सलमानला अपील जामीन मिळवून दिला होता. साळवे हे देशातले सर्वाधिक मानधन घेणाऱ्या वकिलांमध्ये गणले जातात. 2ज्येष्ठ वकील अमित देसाई हे कलाकारांची कायदेशीर बाजू पाहणारे महत्त्वाचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. देसाई यांनी या खटल्यात कायदेशीर त्रुटी असल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणले. तेच सलमानची मुक्तता करण्यासाठी महत्त्वाचे कारण ठरले. सलमान दारू प्यायल्याचे पुरावे घटनास्थळी नसल्याचे, रक्त तपासणी योग्य रितीने न झाल्याचे सांगत, त्यांनी वैद्यकीय अहवालावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.3सेशन कोर्टमध्ये वकील श्रीकांत शिवडे यांनीही सलमानची कायदेशीर बाजू सांभाळली. चित्रपट सृष्टीतील दिग्गजांची कायदेशीर बाजू संभाळण्यासाठी त्यांची विशेष ओळख असून, त्यांनी मधुर भांडारकर, शायनी अहुजा यांच्या प्रकरणात कायदेशीर बाजू मांडली होती. 4सुरूवातीच्या काळात क्रिमिनल लॉयर हर्षद पोंडा यांची या प्रकरणासाठी निवड झाली होती असे समजते. त्यांनी सदोष मनुष्यवधाच़्या गुन्ह्यातून सलमानाची सुटका केली होती.