ऑनलाइन लोकमतमुंबई,दि. 16 - प्रफुल्ल पटेल यांच्या जीवनावरील "उडान-ए ग्राफीक ग्लीम्प्स थ्रू लाइफ ऑफ प्रफुल्ल पटेल" या छायाचित्रांच्या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन रविवारी वरळी येथील नॅशनल स्पोर्टस क्लब( एनएससीआय) येथे झाले. कॅटरीना कैप आणि सलमान खान यांनी व्हिडीओच्या माध्यमातून पटेल यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच चित्रपटाच्या व्यस्त कार्यक्रमामुळे या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याबद्दल सलमान खान आणि कॅटरीना कैफ यांनी खंत व्यक्त केली आहे. कॅटरीना आणि सलमान खान यांनी शुभेच्छा दिलेला व्हिडीओ प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या ट्विटरवर प्रसिद्ध केला आहे. कॅटरीना कैफने कार्यक्रमाला उपस्थित राहता न आल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. परदेशातून मी भारतात आल्यानंतर पुस्तक नक्की वाचेल, असेही सांगायला ती विसरली नाही. सलमान खान म्हणतो, आजपर्यंत ज्या व्यक्तींना भेटलो त्यामध्ये प्रफुल्ल पटेल हे सर्वात शांत स्वभावाचे आणि चांगल्या व्यक्तीमत्वाचे आहेत. जो मैत्रीसाठी काहीही करु शकतो. त्यांनी स्वत:चे एक वेगळे व्यक्तीमत्व तयार केले आहे. ते त्यांच्या कामाबद्दल प्रमाणिक आणि एकनिष्ठ आहेत. दबंग सलमान खान आणि कॅटरीना कैफ सध्या टाईगर दिंदा है च्या शुटींग मध्ये व्यस्त आहेत. वरळीमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या छायाचित्रांच्या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, नीता अंबानी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. याप्रसंगी राजकारण, उद्योग, कला आणि क्रीडा आदी क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीने सभागृह फुलले होते. या सोहळ्यातच प्रफुल्ल पटेल यांनी, आज माझे मोठे बंधू व लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांचा वाढदिवस आहे. आता केक कापून आपण तो साजरा करू, अशी घोषणा केली. मान्यवरांच्या उपस्थितीत विजय दर्डा यांनी केक कापत आपला वाढदिवस साजरा केला होता. यावेळी लोकमत मीडियाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, पूर्वा कोठारी तसेच पुनित कोठारी व रचना दर्डा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज आणि उद्योजक उदय कोटक उपस्थित होते. संवेदनशील गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी शबाना आझमी तसेच चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर या समारंभाचे आणखी एक आकर्षण होते.
सलमान-कॅटरीनाने प्रफुल्ल पटेलांना दिल्या शुभेच्छा
By admin | Updated: May 16, 2017 21:24 IST