नवी दिल्ली : सन २००२ मधील ‘हिट अॅण्ड रन’ खटल्यात पूर्णपणे निर्दोष सोडण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध महाराष्ट्र सरकारने केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणीसाठी दाखल करून घेतल्याने बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या डोक्यावर संभाव्य शिक्षेची टांगती तलवार पुढील काही वर्षे लटकत राहणार आहे. मात्र या अपिलावर लवकर सुनावणी घेण्याची सरकारची विनंती अमान्य करून यथावकाश सुनावणी होईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
सलमानवर टांगती तलवार
By admin | Updated: July 6, 2016 00:54 IST