शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी यंत्रणा हाताशी धरून कुळाच्या जमिनींची विक्री, आदिवासी रस्त्यावर येण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:29 IST

खेड तालुक्यातील निसर्गरम्य भोरगिरी येथील कुळाच्या जमिनींचे बेकायदेशीरपणे प्लॉटिंग करून एजंटांकडून सर्रास विक्री सुरू आहे. गेल्या चार पिढ्यांपासून येथील आदिवासी कुटुंबे ही जमीन कसत असताना परस्पर विक्री सुरू आहे.

सुषमा नेहरकर-शिंदे ।पुणे : खेड तालुक्यातील निसर्गरम्य भोरगिरी येथील कुळाच्या जमिनींचे बेकायदेशीरपणे प्लॉटिंग करून एजंटांकडून सर्रास विक्री सुरू आहे. गेल्या चार पिढ्यांपासून येथील आदिवासी कुटुंबे ही जमीन कसत असताना परस्पर विक्री सुरू आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.भोरगिरी येथील सुमारे १५० एकर जमीन काहींनी आपल्या नावावर करून घेतली; परंतु त्या जमिनीवर सुमारे ८० आदिवासी कुटुंबांची कूळ म्हणून नोंद झाली आहे. गेल्या शंभर वर्षांपासून या आदिवासी कुटंबांची जमिनीवर वहिवाट आहे. भीमाशंकर अभयारण्याला लागून निसर्गरम्य भागात हे प्लॉटिंग केले असून, केवळ ५० हजार रुपये गुंठा दराने ही विक्री सुरू आहे. हे प्लॉटिंग करताना संबंधित एजंटांनी महसूल विभागातील गावपातळीवरील अधिकाºयांना हाताशी धरून कुळांच्या नोंदीमध्ये फेरफार केला आहे. यात दोन पिढ्यांच्या कुळांच्या नोंदी वगळण्यात आल्या असून, केवळ चालू पिढीचे नाव कूळ म्हणून लावले आहे. जमिनीची विक्री करण्यासाठी चाकण, राजगुरुनगर, वाडा, भोरगिरी येथे मोठमोठे बॅनर लावून जमीनविक्रीची जाहिरात करण्यात आली आहे.>स्वस्तात मिळते म्हणून जमीन खरेदी करू नयेगेल्या काही वर्षांत खेडसह जिल्ह्यात सर्वच ठिकाणी एजंटांकडून गुंतागूत असलेल्या जमिनीचे बेकायदेशीरपणे प्लॉटिंग करून स्वस्तात विक्री करण्याचे प्रकार सुरू आहेत. जमीन स्वस्तात मिळते म्हणून नागरिकांकडूनदेखील अशी जमीन खरेदी करण्यासाठी उड्या पडतात; परंतु जमिनीचे ‘टायटल’ क्लीअर असल्याशिवाय कोणत्याही स्वरूपाची जमीन खरेदी करून नये. दरम्यान, खेड तालुक्यातील भोरगिरी येथील बेकायदेशीर प्लॉटिंगसंदर्भांत तक्रार दाखल झाली असून, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. - राजेंद्र मुठे,निवासी उपजिल्हाधिकारी>१५० एकरांचे प्लॉटिंग; आदिवासींची फसवणूकखेड तालुक्यात भोरगिरी येथील तब्बल १५० एकर जमिनीचे प्लॉटिंग करून बेकायदेशीर विक्री सुरू आहे. गेल्या चार पिढ्यंपासून येथील आदिवासी ही जमीन कसत आहेत. सरकारी सर्व कायदे आदिवासी लोकांच्या बाजूचे असताना सरकारी अधिकाºयांना हाताशी धरून कायद्यातून पळवाटा काढल्या जातात. त्यामुळे सर्वसामान्य आदिवासी कुटुंबांवर अन्याय केला जातो. भोरगिरी येथे जमिनी व्यवहाराचे असे प्रकार सुरू आहेत. यामध्ये तातडीने जिल्हाधिकाºयांनी लक्ष घालून फसवणूक त्वरित थांबवावी.-सीताराम जोशी, अध्यक्षआदिवासी समाज कृती समिती