शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळांच्या शिक्षकांचे वेतन रखडले

By admin | Updated: January 27, 2016 23:20 IST

राज्यातील तब्बल ८२0 आश्रमशाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गत दोन महिन्यांपासून वेतनापासून वंचित.

अकोला : भावी नागरिक घडविण्याची जबाबदारी असलेल्या राज्यातील तब्बल ८२0 आश्रमशाळांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर गत दोन महिन्यांपासून वेतनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत राज्यभरात ५२५ प्राथमिक व २९५ माध्यमिक आश्रम शाळा आहेत. या आश्रमशाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकांचे वेतन वेळेवर आणि नियमितपणे व्हावे यासाठी वित्त विभागाकडून सामाजिक न्याय विभागाला अनुदान देण्यात येते. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत या शाळांमधील शिक्षक व शिक्षकांचे वेतन नियमितपणे झाले; परंतु वित्त विभागाकडून अनुदान मंजूर न झाल्याने नोव्हेंबर महिन्यापासून या शाळांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना वेतन मिळाले नाही. आता जानेवारी महिनाही संपत आला, तरी अद्यापही या शाळांवरील कर्मचार्‍यांची वेतनाची प्रतीक्षा संपताना दिसत नाही. वेतन नसल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. मुलांच्या शाळा, शिकवणी वर्गाची फी, गृह व वाहन कर्जाचे हप्ते, आयुर्विमा पॉलिसीचे हप्त थकल्याने अतिरिक्त व्याजाचा भूर्दंड या कर्मचार्‍यांना सहन करावा लागणार आहे. दैनंदिन खर्च भागविण्याचाही प्रश्न उभा ठाकला आहे. वेतन रखडल्याने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकार्‍यांनी समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्तांची भेट घेऊन त्यांच्यासमोर समस्या मांडली; परंतु यावर तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आश्रमशाळा मुख्याध्यापक संघ राज्यभर आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात आहे.पुरवणी अनुदान मिळेनाआश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची वेतने अदा करता यावी, यासाठी सामाजिक न्याय विभागाने शासनाकडे पुरवणी अनुदानाची मागणी केली आहे. शासनस्तरावरून ही मागणी मान्य झाली नसल्यामुळे आश्रमशाळांच्या कर्मचार्‍यांची वेतनाची प्रतीक्षा कायमच आहे.अकोला जिल्हय़ातील शाळाप्राथमिक शाळा -         ११माध्यमिक शाळा -        ६उच्च माध्यमिक शाळा- ४--------------------एकूण                          २१