शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्यासाठी बाहे गाव जिल्ह्यात अग्रस्थानी

By admin | Updated: April 7, 2017 02:41 IST

भाजीपाला पिकाच्या क्षेत्रात सर्वस्वी योगदान देऊन संपूर्ण रायगड जिल्ह्यात एक वेगळे वैशिष्ट्य निर्माण केले आहे

मिलिंद अष्टिवकर,रोहा- कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी या संत चोखामेळाच्या वचनाप्रमाणे ज्या गावाने कर्म हीच देवपूजा मानून स्वत:चा चरितार्थ चालवून भाजीपाला पिकाच्या क्षेत्रात सर्वस्वी योगदान देऊन संपूर्ण रायगड जिल्ह्यात एक वेगळे वैशिष्ट्य निर्माण केले आहे असे रोहे तालुक्यातील कृषीनिष्ठ बाहे गाव. कसदार व ताज्या भाजीसाठी केवळ रोहे तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्याला हेवा वाटावा असे हे गाव. गेल्या अनेक पिढ्यांपासून या गावाने आपला हा व्यवसाय जतन करून ठेवला आहे. रोह्यातून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळणाऱ्या निसर्गरम्य कुंडलिका नदीच्या तीरावर हे गाव वसले आहे. बारमाही वाहणाऱ्या कुंडलिका नदीच्या तीरावर असलेल्या आपल्या शेतीमध्ये या गावात पिढ्यानपिढ्या भाजीपाल्याची शेती पिकविली जात आहे. भाजीपाला क्षेत्रातील सारी कौशल्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत आहेत, तर आज या क्षेत्रात गावातील केवळ वडीलधारी मंडळीच नव्हे तर उच्चशिक्षित तरुणाईनेही आपापली नोकरी सांभाळून झोकून दिले आहे.भाजीपिकांवर कितीही संकटे आली तरी येथील शेतकरी साऱ्या गोष्टींवर मात करीत किमान स्वत:च्या चरितार्थापुरते तरी उत्पादन घेताना दिसत आहेत. येथील भाजीपाल्याच्या वेगळ्या वैशिष्ट्यामुळे साऱ्यांनाच येथील भाजीचे वेगळे आकर्षण आहे. उन्हाळी हंगामात नदीच्या पाण्यावर येथील शेतकरी कित्येक एकराच्या परिसरात भाजीपाल्याची लागवड करीत आले आहेत. रासायनिक खते व कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करून केवळ अंगमेहनत व चिकाटीच्या जोरावर येथील शेतकऱ्यांनी आपला व्यवसाय टिकून ठेवला आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भाजीपेक्षा येथील भाजीचा दर्जा चांगला असल्याने तसेच ताजी भाजी व किफायतशीर दर यामुळे ग्राहकांचीही पहिली पसंती या भाजीलाच येते.उन्हाळी हंगामात भातशेतीला पाणी मिळत नाही. याशिवाय गावाच्या बाजूलाच एमआयडीसीत कारखाने आहेत. परंतु स्थानिकांना येथे कायमस्वरूपी नोकरी मिळत नसल्याने येथील शेतकरी व तरुण वर्गाने आपल्या हक्काची रोजीरोटी म्हणून भाजीपाल्याच्या शेतीकडे विशेष लक्ष दिले आहे. भाजीचे उत्पादन चांगले आले तर संपूर्ण वर्षभराच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटतो, तर कधी उत्पादन कमी आले तर फक्त तात्पुरता चरितार्थ चालतो. येथील शेतीमळ्यात पिकणारी भाजी शेतकरी डोक्यावर टोपले घेऊन तालुक्यातील प्रत्येक गावात फिरत असतात,तर रोह्याची बाजारपेठ तसेच विविध आठवड्यांचे बाजार येथे विकली जाते. काही वर्षांपासून पुणे, महाड, पेण, पनवेल व नवी मुंबई येथील घाऊक व्यापारी थेट शेतमळ्यावर येऊन भाजी खरेदी करीत असल्याने मालाला उठाव देखील चांगला होत आहे, याशिवाय श्रम व पैशांचीही चांगली बचत होत आहे. या व्यापारात शेतकरीवर्गाला बऱ्यापैकी आर्थिक लाभ होताना दिसत आहे. शेतकरी वर्गाने चालविलेला पिढीजात व्यवसाय आधुनिक काळात देखील आदर्शवत ठरत आहे.