शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

साई संस्थानच्या निधीचा विनियोग सत्कार्यासाठी व्हावा!

By admin | Updated: April 14, 2015 01:09 IST

साईबाबा संस्थानच्या पैशांचा विनियोग समाजातील दु:ख व अज्ञान दूर करण्याकरिता व्हावा, अशी अपेक्षा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी साठ वर्षांपूर्वी व्यक्त केली होती.

डॉ़ आंबेडकरांनी व्यक्त केली होती अपेक्षाप्रमोद आहेर - शिर्डीसाईबाबा संस्थानच्या पैशांचा विनियोग समाजातील दु:ख व अज्ञान दूर करण्याकरिता व्हावा, अशी अपेक्षा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी साठ वर्षांपूर्वी व्यक्त केली होती. याबाबतच्या आठवणींना शिर्डीकर आजही उजाळा देत आहेत़ २३ ते २६ जानेवारी १९५४ दरम्यान मुंबईत आयोजित साईभक्त संमेलनाचे उद्घाटन डॉ़ आंबेडकरांच्या हस्ते करण्यात आले होते़ केंद्रीय गृह खात्याचे उपमंत्री दातार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई, रामकृष्ण मिशनचे स्वामी संबुद्धानंद, महसूलमंत्री भाऊसाहेब हिरे, प्राचार्य ए़आऱ वाडिया आदींची उपस्थिती होती़ या वेळी डॉ़ आंबेडकर यांनी संतांच्या नावे पैसा जमवला असल्यास त्याचा विनियोग सत्पात्री व्हावा, आपल्या सभोवताली दैन्य, दारिद्य्र, अज्ञान, रोगराई मोठ्या प्रमाणात पसरली आहे़ त्यामुळे अशा पैशाचा सदुपयोग हे दु:ख, अज्ञान दूर करण्याकरिता केला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती़धर्माच्या बाबतीत आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत, एवढेच नव्हेतर धर्माच्या नावाने पैसा जमा करून तो वाटेल त्या कामी खर्च करणे, हा सध्या अनेकांचा व्यवसाय बनला आहे़ देशात दैन्य व दारिद्य्र इतके बोकाळले आहे की, धर्माच्या नावाने पैसा जमवून तो ब्राह्मण भोजनासाठी किंवा यात्रेकरूंना पोसण्यासाठी खर्च करणे गुन्हा आहे, असे आपण मानत असल्याचे परखड मतही डॉ़ आंबेडकर यांनी तेव्हा व्यक्त केले होते़ या देशात धर्माला वेळोवेळी वेगवेगळे स्वरूप प्राप्त झालेले आहे़ मूर्तीची, साधूसंतांची पूजा करणे किंवा त्यांच्या नादी लागणे हीच सध्या आपल्या धर्माची भिन्नभिन्न स्वरूपे आहेत़ मानवी मनाची ही अत्यंत खालावलेली अवस्था असल्याचे सांगत डॉ़ आंबेडकरांनी धर्माला पूर्वीचे सोज्वळ व पवित्र स्वरूप प्राप्त करून देण्याचे आवाहनही या वेळी भावी पिढीला केले़आपण साईबाबांचे भक्त किंवा अनुयायी नसल्याचे किंवा त्यांना पाहिलेही नसल्याचा खुलासा करत बाबा समाधीस्त झाल्यानंतरही भक्तवर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे डॉ़ आंबेडकरांनी सांगितले़ या भक्त संमेलनात संत गाडगे महाराज व संत तुकडोजी महाराज यांच्या भजन-प्रवचनाचेही कार्यक्रम झाले होते़