शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
4
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
5
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
6
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
7
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
8
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
9
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
10
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
11
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
12
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
13
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
14
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
15
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
16
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
17
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
18
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
19
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
20
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती

आशातार्इंच्या सुरेल मैफलीने जिंकले साहित्य संमेलन

By admin | Updated: January 18, 2016 01:25 IST

‘दया घना...’ अशा अवीट गोडीच्या गाण्यांनी, तसेच ‘रेशमांच्या रेघांनी...’ अशा बहारदार लावण्या सादर करून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांनी पिंपरीकरांचे मन जिंकले

विश्वास मोरे,  ज्ञानोबा-तुकारामनगरी, पिंपरी‘दया घना...’ अशा अवीट गोडीच्या गाण्यांनी, तसेच ‘रेशमांच्या रेघांनी...’ अशा बहारदार लावण्या सादर करून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांनी पिंपरीकरांचे मन जिंकले. आशातार्इंच्या अत्यंत, चिरतरुण, तजेल आवाजाची मोहिनी वयाच्या ८४व्या वर्षीही कायम असल्याचे दिसून आले.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या वतीने आयोजित ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी सायंकाळी आशाताई भोसले यांची संगीत रजनी झाली. शहरात पहिल्यांदाच संगीत रजनी होत असल्याने मंगेश पाडगावकर सभागृह तुडुंब गर्दीने भरले होते. व्यासपीठाबाहेरही मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. रात्री आठच्या सुमारास संगीत रजनीस सुरुवात झाली. ऋषिकेश रानडे यांनी कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील शंकर महादेवन यांनी सादर केलेले ‘सूर निरागस हो...’ हे गीत सादर केले. त्यानंतर आशाताई व्यासपीठावर आल्या. रसिकांनी जोरदार टाळ्या आणि शिट्यांची दाद दिली. सोनेरी आणि चंदेरी किनार असलेली फिकट गुलाबी साडी परिधान केलेल्या भोसले यांनी रसिकांना हात उंचावून अभिवादन केले. हा या शहरातील माझा पहिलाच शो मला खूप आनंद झाला आहे. सर्वांना नमस्कार. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि संगीताची मैफल सुरू झाली. ती सव्वादोन तास सुरू होती. रसिकांशी संवाद साधत, गाण्यांच्या मिश्कीलपणे आठवणी सांगत तार्इंनी मैफल यादगार केली. लतादीदींचा आवाज काढत टाळ्यांची दाद घेतली. माझ्या गायनाची सुरुवात मी आमच्या कुटुंबाचे दैवत श्रीमंगेशाला वंदन करून करते. ‘मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश...’ हे गीत सादर केले. त्यानंतर ‘चांदणे शिंपीत जा...’, ‘ये रे घना ये रे घना...’ हे गीत सादर केले. वयाच्या ८४व्या वर्षीही आशातार्इंचे गाणे तरुण असल्याचे जाणवत होते. त्यानंतर आशातार्इंनी लतादीदींनी गायलेले ‘अवचिता परिमळू....’ हे गीत सादर केले. त्यानंतर बाबूजींनी संगीतबद्ध केलेले ‘जीवलगा कधी रे येशील तू...’, ‘चांदण्यात फिरताना...’, हे गीत गाऊन मैफलीत रंग भरला. प्रेक्षकांमधून व्हिडीओ चित्रीकरण सुरू असल्याचे आशातार्इंच्या लक्षात आले. त्यांनी चित्रीकरण करू नये, अशी विनंती केली. मात्र, चित्रीकरण सुरूच राहिल्याने त्यांनी काही काळ कार्यक्रम थांबविला. त्यानंतर काहीकाळ विश्रांती घेऊन पुन्हा आशाताई गाणे सादर करायला मंचावर आल्या, त्या वेळी त्यांनी गोल ठिपक्यांची लाल रंगाची साडी परिधान केली होती. त्यानंतर आशातार्इंनी ‘नाच नाचुनी अति मी दमले...’ ही गीत सादर केले. त्यानंतर लावणीची फर्माईश करताच आशातार्इंनी वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेली ‘बुगडी माझी सांडली गं...’ ही लावणी सादर केली. त्यावर रसिकांमधून वन्स मोअर असा आवाज आला. त्यानंतर आशातार्इंनी ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजती...’, ‘गोमू संगतीनं...’, ‘गेले राहून गेले...’, ‘रेशमांच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी...’ अशी गाणी आणि लावणी पेश करून रसिकांची दाद घेतली. गानवैशिष्ट्यांच्या आठवणी सांगत सुधीर गाडगीळ यांच्या मैफलीत रंग भरला. आशातार्इंना बोलते केले. रसिक-श्रोत्यांच्या तुडुंब उत्साहात कार्यक्रमात रंगत आणली.