शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘विक्रांत’च्या सुरक्षेसाठी अंबरनाथचे ‘कवच’; युद्धनौकेचे करणार संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 08:20 IST

ही मिसाईल ‘विक्रांत’पासून ३ ते ५ किमी अंतरावर शत्रूच्या मिसाईलसमोर एक युद्धनौका उभी असल्याचा आभास निर्माण करेल. ज्यामुळे शत्रूची मिसाईल तिथेच फुटेल आणि विक्रांतचे संरक्षण होईल.

अंबरनाथ : भारतीय नौदलाच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेल्या ‘विक्रांत’ युद्धनौकेचे रक्षण अंबरनाथचे ‘कवच’ करणार आहे. कवच ही अँटिमिसाईल सिस्टीम असून ती विक्रांत युद्धनौकेचे मिसाईल हल्ल्यापासून रक्षण करणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील अंबरनाथच्या मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी ही अँटिमिसाईल सिस्टीम तयार करण्यात आली आहे.

देशावर सागरी मार्गाने होणारी आक्रमणे रोखण्यासाठी आणि तितक्याच ताकदीने परतवून लावण्यासाठी विक्रांत ही युद्धनौका २ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. ही युद्धनौका देशाचे रक्षण करत असली, तरी या युद्धनौकेचे संरक्षणही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे शत्रू सैन्याने या युद्धनौकेवर एखादे मिसाईल डागले, तर त्यापासून रक्षण करण्यासाठी या युद्धनौकेवर कवच ही अँटिमिसाईल सिस्टीम बसवण्यात आली आहे. ज्यावेळी शत्रूकडून विक्रांतवर एखादे मिसाईल डागण्यात येईल, त्यावेळी रडारच्या माध्यमातून कवचला सूचना जाऊन आपोआप त्यातून एक मिसाईल फायर होईल. 

ही मिसाईल ‘विक्रांत’पासून ३ ते ५ किमी अंतरावर शत्रूच्या मिसाईलसमोर एक युद्धनौका उभी असल्याचा आभास निर्माण करेल. ज्यामुळे शत्रूची मिसाईल तिथेच फुटेल आणि विक्रांतचे संरक्षण होईल. विक्रांतवर चार ठिकाणी बसवलेली ही संपूर्ण सिस्टीम संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील अंबरनाथच्या मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत (एमटीपीएफ) तयार करण्यात आली आहे. त्यामुळे देशाचा अभिमान असलेल्या विक्रांतला अंबरनाथचे सुरक्षा कवच असणे ही अंबरनाथकरांसाठी मोठी गौरवाची बाब ठरली आहे. मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीचे प्रमुख, चीफ जनरल मॅनेजर राजेश अगरवाल यांनीही आपल्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे म्हटले आहे.

विविध नाैकांवर सिस्टीम कार्यान्वित२००६ पासून या फॅक्टरीत ‘कवच’ या अँटिमिसाईल सिस्टीमची निर्मिती सुरू झाली. ही सिस्टीम संपूर्ण ‘एमटीपीएफ’ फॅक्टरीच्या अधिकारी आणि कामगारांनी मिळून तयार केली आहे. परदेशी तंत्रज्ञानाचा यासाठी वापर केलेला नाही. आतापर्यंत अशा १३ ‘कवच’ अँटिमिसाईल सिस्टीम भारतीय नौदलाच्या विविध युद्धनौकांवर बसवण्यात आल्या आहेत.