शिर्डी : तासन्तास रांगेत उभे राहण्याचा त्रास टाळण्याकरिता साईसंस्थान तिरुपतीच्या धर्तीवर टाइम दर्शन सुरू करणार असल्याची माहिती साईसंस्थानच्या त्रिसदस्यीय समितीचे सदस्य व जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिली़तिरुपती देवस्थान व वैष्णोदेवी देवस्थानांना ज्या एजन्सी मार्फत टाइम दर्शन सुविधा पुरवण्यात येते़ त्या एजन्सीने येथेही ही सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे़ संस्थान या एजन्सीला येथे केवळ जागा व संगणक उपलब्ध करून देणार आहे़ याशिवाय संस्थानला यासाठी वेगळी कोणतीही गुंतवणूक किंवा खर्च करावा लागणार नाही़ भाविकांनी दर्शनासाठी नोंदणी केल्यानंतर त्याला विशिष्ट वेळेचा उल्लेख असलेले तिकीट देण्यात येईल. (प्रतिनिधी)
साईदरबारीही ‘टाइम दर्शन’
By admin | Updated: September 15, 2015 01:02 IST