शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊ खोतांनी दिली 'दिलजमाई'ची ऑफर; पण राजू शेट्टी यांनी ती 'अशा'प्रकारे धुडकावून लावली

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: February 2, 2021 18:04 IST

सदाभाऊ खोतांनी कोरोनानंतर राजू शेट्टी आणि मी एकत्र बसू असे वक्तव्य करत एकप्रकारे शेट्टी यांना 'दिलजमाई'ची ऑफरच देऊ केली होती.

बारामती : पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी चळवळ तळागळापर्यंत रुजविण्यात यशस्वी ठरलेले आणि एकेकाळी एकमेकांचे कट्टर मित्र असलेले दोन नेते राजकारणाच्या वाटचालीत मात्र आता पक्के वैरी झाले असल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळते आहे. या दोन नेत्यांनी आपापल्या आक्रमक आंदोलनामुळे बारामतीत येऊन पवारांना आव्हान दिले होते. यात एक नाव म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व दुसरं रयत शेतकरी क्रांती संघटनेचे  सदाभाऊ खोत हे आहे. आज न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या या दोन नेत्यांनी बारामतीचे राजकारण ढवळून निघाले. पण याचवेळी सदाभाऊ खोतांनी दिलेली दिलजमाईची "ऑफर "राजू शेट्टी यांनी मी असंगाशी संग करत नाही म्हणत थेट धुडकावून लावली.

बारामतीत 2012 साली ऊसदर आंदोलनामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यातील खटल्याची आज अंतिम सुनावणी होती. यामुळे माजी खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री सदाभाऊ खोत हे फोन नेते बारामतीत आले होते. यावेळी दोघांनी आपले वेगवेगळे 'टायमिंग' साधत पत्रकारांशी संवाद साधला. तसेच दुपारच्या सत्रात हे दोन नेते समोरासमोर आले. त्यावेळी एकमेकांना ते कसे सामोरे जातात याबद्दल उपस्थितांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.मात्र दोघांनी पण एकमेकांना टाळले अन् सर्वांचाच हिरमोड झाला. 

सदाभाऊ खोतांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खोतांनी कृषी कायद्यांचे समर्थन करताना काँग्रेस राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली तर शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर खरमरीत शब्दात भाष्य केले.  खोत यांनी मंगळवारी सकाळीच न्यायालयात हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना कोरोनानंतर राजू शेट्टी आणि मी एकत्र बसू असे वक्तव्य करत एकप्रकारे शेट्टी यांना दिलजमाईची ऑफरच देऊ केली होती. यानंतर हे दोन नेते पुन्हा एकत्र येतात की काय अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात झडू लागली होती.

मात्र, दुपारी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पण सर्वांना उत्सुकता होती ती शेट्टी हे खोत यांनी दिलेली ऑफर स्वीकारणार का नाही याची.पण त्यांनी खोत यांची ऑफर धुडकावून लावताना, बसण्याचे विविध प्रकार असतात, पण मी असंगाशी संग करत नाही अशी प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेने भविष्यात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे दोन मातब्बर नेते एकत्र येण्याची आशा मावळली.

टॅग्स :BaramatiबारामतीPoliticsराजकारणRaju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत