शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

‘सा. रें.’च्या जाण्याने चळवळीचा मार्गदर्शक हरपला

By admin | Updated: April 2, 2015 00:36 IST

कार्यकर्त्यांची भावना : सांगलीशी जुळले होते ऋणानुबंध, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते झाले सुन्न

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारख्यान्याचे संस्थापक आणि काँग्रेसचे आमदार आणि विचारांनी ‘तरुण’ असलेले सा. रे. ऊर्फ आप्पासाहेब पाटील पुरोगामी विचारांशी इतके समरस झाले होते की, त्यांना पक्षाचे बंधन आड आले नाही. आज (बुधवारी) सकाळी ‘सा. रे.’ यांचे निधन झाल्याचे वृत्त आले आणि सांगलीमधील चळवळीतील कार्यकर्ते अक्षरश: सुन्न झाले. शांतिनिकेतनशी त्यांचे स्नेहबंध जुळले असल्याने तेथेही शांतता होती. शांतिनिकेतन लोकविद्यापीठ आणि सा. रे. पाटील यांचा ऋणानुबंध अतिशय दृढ होता. शांतिनिकेतनच्या नवभारत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून ते कित्येक वर्षापासून जबाबदारी सांभाळत होते. वर्षातून कमीत कमी दोन वेळा तरी वयाची पर्वा न करता ते शांतिनिकेतनमधील बैठकीस हजर असत. शांतिनिकेतनमध्ये कोणताही महत्त्वाचा कार्यक्रम असेल, तर ‘सा. रें.’ची उपस्थिती हमखास असायचीच. प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह. शांतिनिकेतनमध्ये कोणताही नवीन उपक्रम राबवायचा म्हटले की, पहिला निरोप हा ‘सा. रें.’ना असायचा. तेथे १६ जानेवारी २०१५ रोजी पंचायतराज स्मृती उद्यानाच्या उद्घाटन समारंभास ते ९४ व्या वर्षीही हजर होते. आज सकाळी सा. रे. पाटील यांचे निधन झाल्याचे कळताच शांतिनिकेतनमधील प्रत्येक कर्मचारी आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावर दु:खाची छटा दिसत होती. शांतिनिकेतनचा आधार असलेल्या सरोजमाई, त्यानंतर पी. बी. सर, नंतर आर. आर. पाटील आबा आणि आता सा. रे. पाटील गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने १९९३ मध्ये चळवळीतील कार्यकर्त्यांचे मुखपत्र म्हणून ‘अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्र’ काढण्याचे निश्चित झाले. परंतु नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांपुढे पैशाची अडचण उभी राहिली. त्यावेळी सर्वजण सा. रे. पाटील यांच्याकडे गेले होते. त्यांना वस्तुस्थितीची कल्पना देताच, समाजातील अंधश्रध्दा दूर होण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याची कृतिशील ग्वाही त्यांनी दिली होती. ‘अंनिस’तर्फे शहरात आयोजित केलेल्या ‘वैज्ञानिक जाणिवा’ या शिबिराच्या उद्घाटनास ते आवर्जून आले होते. अंनिसतर्फे, दत्त कारखान्याच्या मागील बाजूस असलेल्या खंजीरे मळा येथील मांत्रिकाचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी स्थानिक राजकारणामुळे बाका प्रसंग निर्माण झाला होता. त्यावेळी सा. रे. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले होते, अशी आठवण अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. प्रदीप पाटील यांनी सांगितली. (प्रतिनिधी) नवभारत शिक्षण मंडळाच्या जडणघडणीत प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील सरांसमवेत माजी आमदार डॉ. सा. रे. पाटील यांचा महत्त्वाचा वाटा होता. अनेक विकास कामात तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात त्यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळत असे. - गौतम पाटील, संचालक, नवभारत शिक्षण मंडळ, आठवणींमधून उतरले सा. रे. महाराष्ट्रातील सामाजिक संघटनांनी एकत्र यावे म्हणून सांगली येथे चित्रपट अभिनेते नंदू माधव यांच्या संकल्पनेतून ‘सांगड’ या उपक्रमाचे २०१३ मध्ये आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सा. रे. पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्याची आठवण अ‍ॅड. अमित शिंदे यांनी सांगितली. पत्रकार दीनानाथ भोसले हे त्यावेळी सांगलीत दोन दैनिके चालवत होते. ते समाजवादी विचाराचे असल्याने त्यांचे व सा. रे. पाटील यांचे मित्रत्वाचे संबंध होते. याच मित्रत्वातून सांगलीत विविध राजकीय विचारांच्या लोकांचा एक गट निर्माण झाला. अण्णासाहेब कराळे यांच्या कट्ट्यावर त्यांचा गप्पांचा फड रंगत असे. सांगली जिल्हा सुधार समितीच्यावतीने सांगलीत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या व्याख्यानाचे नियोजन नुकतेच केले होते. ही कल्पना सा. रे. पाटील यांना समजताच त्यांनी स्वत:हून कार्यक्रमासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला होता. मिरज येथील आय. एम. ए. सभागृहात सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव सा. रे. पाटील यांच्याहस्ते फेब्रुवारी २०१३ मध्ये करण्यात आला होता. त्यावेळी सा. रे. पाटील यांनी, धावपळीच्या युगात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीला स्थान नसल्याची खंत व्यक्त केली होती, असे राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते सदाशिव मगदूम यांनी यावेळी सांगितले. सा. रे. पाटील हे काँग्रेसचे आमदार असले तरीही, समाजवादी आणि पुरोगामी कार्यकर्त्यांबरोबर त्यांचा विशेष स्नेह होता. रयत शिक्षण संस्थेशी देखील त्यांचा ऋणानुबंध होता. वेळोवेळी त्यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले असल्याचे रयत शिक्षण संस्था समितीचे प्रतिनिधी अ‍ॅड. अजित सूर्यवंशी यांनी सांगितले.