शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी धावले कळंबोलीकर

By admin | Updated: August 15, 2016 03:43 IST

स्वच्छ शहर... सुंदर शहराचा संकल्प करीत कळंबोलीवासीयांनी रविवारी धाव घेतली.

कळंबोली : स्वच्छ शहर... सुंदर शहराचा संकल्प करीत कळंबोलीवासीयांनी रविवारी धाव घेतली. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साई प्रतिष्ठान व कळंबोली साई सेवा संस्थेच्या वतीने ‘एक धाव स्वच्छते’साठी या मिनी मॅरेथॉनचे आयोजन केले होते. याला विद्यार्थी, रहिवासी आणि ज्येष्ठ नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. लोकमत या मॅरेथॉनचे माध्यम प्रायोजक होते. सध्या देशात स्वच्छ भारत अभियान जोरात सुरू आहे. केंद्र व राज्य शासनाकडून स्वच्छतेवर अधिक भर दिला जात आहे. स्थानिक पातळीवर स्वच्छतेचा जागर व्हावा याकरिता कळंबोली साईभक्त सेवा संस्था व साई प्रतिष्ठानने पुढाकार घेतला होता. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या मॅरेथॉनला सकाळी ७ वाजता करवली चौकात आमदार प्रशांत ठाकूर यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. करवली चौकातून रोडपाली येथील पल्लवी हॉटेल येथून वळण घेऊन पुन्हा त्याच चौकात सांगता झाली. एकूण तीन कि.मी. अंतराची ही धाव होती. ८ ते १२ आणि १३ वर्षांपुढील खुला गट त्याचबरोबर अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांकरिता स्वतंत्र गट पाडण्यात आले होते. आयोजकांच्या वतीने प्रथम तीन विजेत्यांना पदक व उत्तेजनार्थ पारितोषिक असे ४८ बक्षिसांचे वाटप करण्यात आले. मॅरेथॉनकरिता शाळा आणि महाविद्यालयांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कळंबोलीत साई प्रतिष्ठान आणि कळंबोली साई भक्त सेवा संस्थेच्या वतीने ‘स्वच्छतेकरिता एक धाव’ ही मिनी मॅरेथॉन आयोजिन केली. मॅरेथॉनच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर करण्यात आला, ही बाब कौतुकास्पद आहे. आपले घर ज्याप्रमाणे स्वच्छ ठेवले जाते त्याचप्रमाणे परिसर व शहर स्वच्छ ठेवण्याकरिता सगळ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले. मॅरेथॉनकरिता शिवबा व रण स्वराज्य ढोल-ताशा पथक कळंबोली, प्रदीप स्पोर्ट्स, निखील येवले पाटील, गिरीश धुमाळ, गीता नाईक, नीलम मसुकर, भूमी पांचाळ, निशा पाटील, विलास पाटील, निखील शिंदे, जितेश साळुंके, मयूर वाळके, प्रवीण म्हात्रे, संजय गावंड, मनोज जाधव यांनी सहकार्य केले. स्पर्धेच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष नितीन काळे, कार्याध्यक्ष संदेश पाटील, वीरेंद्र पाटील, गणेश कारंडे, जितेश कुडाळकर, दत्ता ठाकूर, हेमंत हिरे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)>मॅरेथॉनमध्ये घडले सामाजिक बांधिलकीचे दर्शन‘स्वच्छतेकरिता एक धाव’ या मॅरेथॉनमध्ये सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. संकल्प हेमंत कुमार हा साडेतीन वर्षांचा मुलगा पॅलेसिनिया या आजाराने ग्रस्त आहे. त्याच्यावर शस्त्रक्रि या करण्याकरिता श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांनी पन्नास हजारांची मदत जाहीर केली. त्याचबरोबर शिवाबा ढोल-ताशा पथकाने वर्षभरात होणारी कमाई संकल्पला मदत म्हणून देण्याचा संकल्प केला.