शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

अफवांचा टायर ब्लास्ट

By admin | Updated: September 30, 2014 00:33 IST

निवडणुकीच्या बैठकीला येण्यास नकार दिल्यामुळे कुख्यात गुंडाने दोन तरुणांवर जोरदार हल्ला चढवला. मारहाणीची ही घटना सुरू असतानाच एका दुचाकीचे टायर फुटल्यामुळे फायरिंग झाल्याची

निवडणुकीच्या बैठकीला येण्यास नकार : गुंडांकडून मारहाणनागपूर : निवडणुकीच्या बैठकीला येण्यास नकार दिल्यामुळे कुख्यात गुंडाने दोन तरुणांवर जोरदार हल्ला चढवला. मारहाणीची ही घटना सुरू असतानाच एका दुचाकीचे टायर फुटल्यामुळे फायरिंग झाल्याची जोरदार अफवा पसरली. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत ‘त्या’ गुंडाची धुलाई करीतच त्याला आज अटक केली.ताजाबादमधील आजाद कॉलनीत शेख साजिद या तरुणाचे सायकल स्टोर्स आहे. रविवारी रात्री दुकान बंद करून तो शाहबाज नामक भावासोबत आपल्या घरी जात होता. कुख्यात पापा, सलमान, शाहरूख आणि अन्य एक अशा चौघांनी साजिदला रोखले. ‘भाई के घर नेताकी मिटिंग है चलना पडेगा’ असे म्हणत त्याला अक्षरश: खेचतच तेथून बैठकीच्या स्थळी नेण्याचे प्रयत्न झाले. साजिद आणि शाहबाजने नकार देताच पापा आणि त्याच्या दोन साथीदारांनी साजिद व शाहबाजला बेदम मारहाण केली. या घटनेने परिसरात तणाव निर्माण केला. घटनास्थळी मोठी गर्दी जमली असतानाच एका दुचाकीचे टायर फुटले. त्यामुळे घटनास्थळी गोळीबार झाल्याची अफवा काहींनी पसरवली. रात्री ११.३० ला या घटनेची सक्करदरा ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलिसांनी गुन्हे दाखल करून प्रकरण चौकशीत घेतले.(प्रतिनिधी)तडीपार पापाची दहशतपापा या कुख्यात गुंडाची परिसरात प्रचंड दहशत आहे. त्याला यापूर्वीही तडिपार करण्यात आले होते. मात्र, तो याच भागात फिरतो. सक्करदरा ठाण्यातील काही जणासोबत पापाची मैत्री आहे. त्यामुळे पापाविरुद्ध कुणी शब्द काढत नाही. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त ईशू सिंधू यांनी या घटनेची गंभीर नोंद घेतली. त्यांनी स्वत:च आज दुपारी पीडित साजिदचे घर गाठले. त्याला घटनेबाबत विचारणा केली. नंतर परिसरातील नागरिकांकडून या घटनेची माहिती जाणून घेतली. गोळीबाराचा सर्वांनीच इन्कार केल्याचे डीसीपी सिंधू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नेत्यांनी पोसलेले गुंड सक्रियकुख्यात पापाला त्याच्या साथीदारांसह तासाभरात हुडकून काढण्याचे आदेश डीसीपी सिंधू यांनी पोलिसांना दिले. त्यामुळे पोलीस सक्रिय झाले. एका घरात दडून बसलेल्या पापाला पोलिसांनी बदडतच बाहेर काढले. त्याच्या एका साथीदाराच्या पत्नीची प्रकृती खराब असल्याने त्याने रात्री ठाण्यात येतो, असे सांगून आपली मानगुट सोडवली. तिसरा फरार असून, चौथ्याने मारहाण केली नाही, तर आपल्याला पापाच्या तावडीतून सोडवल्याचे साजिदने पोलिसांना सांगितले. निवडणुका जाहीर होताच नेत्यांनी पोसलेले गुंड सक्रिय झाल्याचे या घटनेमुळे स्पष्ट झाले आहे.