शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानात मिळणार ३५ रुपये किलोने तूरडाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 05:59 IST

रेशन दुकानांमध्ये ३५ रुपये किलो दराने तूरडाळीची विक्री करण्यात येणार आहे. आतापर्यंत हा दर ५५ रुपये इतका होता. मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई : रेशन दुकानांमध्ये ३५ रुपये किलो दराने तूरडाळीची विक्री करण्यात येणार आहे. आतापर्यंत हा दर ५५ रुपये इतका होता. मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.कर्नाटक व तामिळनाडूमध्ये रेशनच्या तूरडाळीचा दर अनुक्रमे ३८ व ३० रुपये आहे. राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत कमीतकमी किमतीत तूरडाळीची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणेशासनाचे सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था, पूर्णत: अथवा अंशत: अनुदानित संस्था याद्वारे होणारी तूरडाळीची खरेदी पुढील आदेश होईपर्यंत फक्त महाराष्ट्र राज्य पणन महासंघाकडून शासकीय दराने करण्यास बंधनकारक करण्यात आले आहे.३ सैनिकी शाळांतील ३६ शिक्षक पदांना अनुदानयशवंतराव चव्हाण सैनिकी शाळा (सुपखेला, ता. जि. वाशिम), राजीव गांधी मिलिटरी स्कूल (कोलवड, ता.जि. बुलढाणा) आणि ईश्वर देशमुख सैनिकी शाळा (सावंगा बुद्रूक, ता. जि. यवतमाळ) या सैनिकी शाळांना प्रत्येकी सहा तुकड्याआणि प्रति तुकडी दोन प्रमाणे३६ शिक्षकपदे मंजूर करण्यातआली.सातारा मेडिकल कॉलेजसाठी जागासातारा येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाची जागा कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. शासनाकडून सातारा येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेस सलग २५ एकर जागा आवश्यक असते. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महाविद्यालयाचा परिसर सातारा शहरालगत असणे आवश्यक आहे. त्यामुळे कृष्णा खोरे विकास महामंडळाची जागा विनाअट व विनामूल्य हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली.समृद्धी महामार्गाच्या करारनाम्यासाठी मंजुरीमहाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व दुय्यम कंपनी नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वे लिमिटेड यांच्यामध्ये करण्यात येणाऱ्या करारनाम्याच्या प्रारूपास व त्यांच्यामध्ये त्रिपक्षीय करारनामा करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच निविदेनुसार येणारी प्रकल्पाची अंतिम किंमत व त्यानुसारचा सवलत कालावधी वित्त विभागाच्या मान्यतेने अंतिम करण्यास मान्यता देण्यात आली.आपद्ग्रस्तांना मदतीसाठी कायमस्वरूपी उपसमितीआपद्ग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. मदत व पुनर्वसन मंत्री हे उपसमितीचे अध्यक्ष असतील. या उपसमितीस मदत जाहीर करण्याबाबत जादाचे अधिकारही देण्यात आले.