पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राखीव जागांच्या २५ टक्के प्रवेशप्रक्रियेची दुसरी फेरी रेंगाळल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी प्राथमिक शिक्षण संचालनालयात ‘झोपा काढा’ आंदोलन करण्यात आले. प्रवेशाची दुसरी फेरी तातडीने सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील शाळांमध्ये आरटीई प्रवेशप्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण होऊन बरेच दिवस उलटून गेले. त्यानंतर दुसरा टप्पा सुरू होण्याची प्रतीक्षा पालकांना लागून राहिली आहे. मात्र, याबाबत शिक्षण विभागाकडून काहीही ठोस माहिती दिली जात नाही, असे मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, प्राथमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी गुरूवारपर्यंत दुसरी सोडत काढणार असल्याचे आश्वासन आपच्या सदस्यांना दिले. दुसऱ्या फेरीसाठी पालक प्रतीक्षेत असल्याचे आपचे मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
आरटीई प्रवेशप्रश्नी मनसेचे ‘झोपा काढा’ आंदोलन
By admin | Updated: June 11, 2016 01:15 IST