शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

केडीएमसी स्मार्ट सिटीसाठी ६ हजार ५०० कोटींचा आराखडा

By admin | Updated: October 4, 2015 04:19 IST

कल्याण-डोंबिवलीतील युवकांना रोजगारासाठी दीड-दोन तासांचा धक्काबुक्की आणि घुसमटत प्रवास करावा लागणार नाही. या ठिकाणीच एक लाख नोकऱ्या पहिल्या टप्प्यात

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीतील युवकांना रोजगारासाठी दीड-दोन तासांचा धक्काबुक्की आणि घुसमटत प्रवास करावा लागणार नाही. या ठिकाणीच एक लाख नोकऱ्या पहिल्या टप्प्यात आणि त्या नंतरच्या टप्प्यात मोजता येणार नाहीत एवढ्या संधी निर्माण होणार आहेत. या ठिकाणीच वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी राज्य शासनाने ६ हजार ५०० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. एवढेच नव्हे, तर स्मार्टसह सेफ सिटीसाठीही या महापालिकेला प्राधान्य दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीत भाजपाच्या विकास परिषद कार्यक्रमात केली. ६,५०० कोटींमध्ये ३०० कोटी पाणी नियोजनासाठी, ३०० कोटी घनकचरा निर्मूलन, १८२२ कोटी रस्ते, आरोग्यासाठी १५०० कोटी, एसआरए योजनेसाठी १ हजार कोटी, प्रदूषणमुक्तीसाठी १७२ कोटी यासह विविध सुधारणा करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. त्यासाठीचा कृती आराखडा तयार असून त्यातून स्मार्ट सिटी निर्माण केली जाणार आहे. राज्यात विविध प्रकल्पांसाठी गुंतवणूक करण्यासाठी जपानसह चीन हे देश तयार असून त्या दृष्टीने बोलणीही सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. त्यात ऐतिहासिक कल्याण आणि सांस्कृतिक नगरी असलेले डोंबिवली कसे काय वंचित ठेवले जाणार, असे ते म्हणाले.नागपूरवगळता बहुतांशी ठिकाणी पाणीगळती आणि त्याच्या पुरवठ्यातील नियोजनाचा अभाव असल्याने अनेक समस्या निर्माण होतात. त्या होऊ नयेत, यासाठी चांगले नियोजन आणि पारदर्शकता आणणे आवश्यक आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पारदर्शक कारभार यांच्या माध्यमातून आपण ही शहरे स्मार्ट करणार आहोत. ही केवळ आश्वासने नसून आगामी काळात प्रत्यक्ष कृतीतून ते आपल्याला दिसेल, असेही ते म्हणाले. सुरक्षित शहरांबाबत ते म्हणाले की, पुणे शहरासारखी यंत्रणा येथे कार्यान्वित होणार असून देशातील केवळ एकमेव पुणे शहर पूर्णत: सीसी कॅमेऱ्यांमध्ये बंदिस्त आहे. त्यामुळे कोणत्याही गैरव्यवहारावर लक्ष ठेवण्यास साहाय्य होत आहे. शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीही सुरक्षा त्यातून ठेवली जात आहे. त्यामुळे पालकांची चिंता मिटवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आगामी काळात सरकारची गुणवत्ता, परिणामकारकता आणि दिलेल्या सर्व आश्वासनांचे-सेवांचे उत्तरदायित्व या निकषांवर काम करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या वेळी व्यासपीठावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, समाजकल्याणमंत्री दिलीप कांबळे, खासदार कपिल पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, नरेंद्र पवार, किसन कथोरे, गणपत गायकवाड, मंगलप्रभात लोढा आदींसह माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शशिकांत कांबळे, राहुल दामले, आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कोळसेवाडी आमदार गणपत गायकवाड यांच्या संपर्क र्कायालयाचे उद्घाटन केले.