शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘रोटरी क्लब’ने उचलला रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेचा विडा!

By admin | Updated: March 12, 2016 02:23 IST

भुसावळ मंडळातील १0 रेल्वे स्थानकांवर राबविणार ‘स्वच्छ भारत’ अभियान!

अकोला: रेल्वे प्रशासनाच्यावतीने देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर ह्यस्वच्छ रेल - स्वच्छ भारतह्ण हे अभियान राबविले जात आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी व्हावी, याकरिता रोटरी क्लबने विभागातील १0 रेल्वे स्थानकांवर हे अभियान राबविण्याचा विडा उचलला आहे. रेल्वे आणि रोटरी क्लब ३0३0 यांच्यात तीन वर्षांसाठी झालेल्या करारानुसार रोटरीच्यावतीने हे अभियान अकोल्यासह विभागातील अमरावती, बडनेरा, शेगाव, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड व नाशिक रोड रेल्वे स्थानकावर राबविले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये कार्य करणारी रोटरी संघटना सन १९0५ मध्ये अस्तित्वात आली. संपूर्ण जगात या संघटनेचे १.३ कोटींपेक्षा अधिक सदस्य असून, देशातील ५३0 जिल्ह्यांत ३३ हजार शाखा या संघटनेने स्थापन केल्या आहेत. विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक कार्य करणार्‍या या संघटनेची विदर्भात ह्यरोटरी क्लब ३0३0ह्ण ही शाखा कार्यरत आहे. रोटरी क्लबच्या या शाखेने भुसावळ मंडळातील १0 रेल्वे स्थानकांवर स्वच्छता अभियान राबविण्याचा विडा उचलला आहे. यासाठी तीन वर्षांचा करार २६ फेब्रुवारी २0१६ रोजी मध्य रेल्वे भुसावळ मंडळाचे विभागीय व्यवस्थापक आणि रोटरी क्लब ३0३0 चे जिल्हा राज्यपाल डॉ. निखिल किबे यांच्यात झाला. यावेळी संघटनेचे महेश मोखडकर, डॉ. के. एस. राजन व राजीव शर्मा उपस्थित होते. या अभियानाची व्याप्ती धुळे, बुलडाणा, यवतमाळ तसेच बर्‍हाणपूर व खंडवा या रेल्वे स्थानकांपर्यंत राहणार आहे. या अभियानाची अंमलबजावणी करीत असताना रेल्वे स्थानकांची स्वच्छता आणि सुंदरतेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. लोकसहभाग वाढविण्यासाठी आणि सुरक्षिततेबाबत जनजागृतीही करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. निखिल किबे यांनी दिली.