शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

रोस्टर घोटाळ्यात लवकरच दणका!

By admin | Updated: September 9, 2014 01:18 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील रोस्टर घोटाळ्यात सामील आरोपींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासंदर्भात येत्या दोन आठवड्यांत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही सीताबर्डीचे पोलीस

हायकोर्टात पोलिसांचे प्रतिज्ञापत्र : फौजदारी कारवाईबाबत निर्णय घेणारनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील रोस्टर घोटाळ्यात सामील आरोपींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासंदर्भात येत्या दोन आठवड्यांत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही सीताबर्डीचे पोलीस निरीक्षक संजय वेरणेकर यांनी आज, सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून दिली.रोस्टर घोटाळ्याशी संबंधित अनेक कागदपत्रे जमा करण्यात आली आहेत. घोटाळ्याचा तपास जवळपास पूर्ण झाला आहे. यासंदर्भात दोन आठवड्यांत निर्णय घेऊन न्यायालयात अहवाल सादर करण्यात येईल, असे वेरणेकर यांनी नमूद केले आहे. रोस्टर घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई करण्यासाठी प्रा. सुनील मिश्रा यांनी फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. यापूर्वीही त्यांनी दोन याचिका दाखल केल्या होत्या. परंतु, आरोपींवर कारवाई झाली नसल्याने मिश्रा यांनी तिसऱ्यांदा न्यायालयाचे दार ठोठावले आहे. २००२ ते २००८ या कालावधीत राखीव प्रवर्गातील ५०६ नियुक्त्यांमध्ये झालेला गैरप्रकार ‘रोस्टर घोटाळा’ म्हणून ओळखला जातो. घोटाळ्याच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जी. जी. लोणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीने ५ जानेवारी २०११ रोजी तत्कालीन कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांना अहवाल सादर करून आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४६९, ४७१ अन्वये गुन्हा नोंदविण्याची शिफारस केली आहे. यानंतर राज्य शासनाने स्थापन केलेल्या दुसऱ्या समितीनेही ४ डिसेंबर २०१० रोजीच्या अहवालात आरोपींविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस केली आहे. परंतु, प्रत्यक्षात काहीच झालेले नाही, असे मिश्रा यांचे म्हणणे आहे.मिश्रा यांनी ७ जुलै २००९ रोजी सीताबर्डी पोलीस ठाण्यात घोटाळ्याची तक्रार नोंदविली होती. २० आॅगस्ट २०११ रोजी सर्व दस्तावेजांसह तक्रार दिली होती. यानंतर पोलीस सह-आयुक्तांनी याप्रकरणी योग्य कारवाई करण्यासाठी १७ डिसेंबर २०११ रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिवांना पत्र पाठविले. घोटाळ्यात वजनदार आरोपी सामील असल्यामुळे पोलीस दबावात असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात यावे, निर्धारित वेळेत चौकशी पूर्ण करून आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात यावी व न्यायालयात कृती अहवाल सादर करण्यात यावा, अशी याचिकाकर्त्याची विनंती आहे. न्यायालयात मिश्रा यांनी स्वत: बाजू मांडली. पुढील सुनावणी एक आठवड्यानंतर आहे.(प्रतिनिधी)