शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

‘एकला चलो’ची भूमिका, मत विभाजनाचा धोका

By admin | Updated: February 20, 2017 21:02 IST

‘एकला चलो’ची भूमिका, मत विभाजनाचा धोका

अमरावती : मतदानाला काही तास उरले असताना बहुतेक गण-गटांमध्ये मात्र वेगळेच चित्र अनुभवाला येत आहे. आतापर्यंत सोबतीने पक्षासाठी मतदान मागणारे उमेदवार अंतिम वाटेत ‘एकला चलो’ या भूमिकेत आले आहे. एकेका मतासाठी संघर्ष अटळ असल्याने जुगाड तंत्राचा वापर सुरू झाला असल्याने मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंगची भीती निर्माण झाली आहे. यामुळे मतमोजणीअंती अनपेक्षित चित्र अनुभवास येणार आहे.

जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीच्या ८८ गणांसाठी मंगळवार २१ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. मतदानापूर्वीच्या अंतिम काही तासांत मात्र वेगळेच चित्र अनुभवायला येत आहेत. यापूर्वी प्रचारात एकत्रपणे फिरून पक्षासाठी मते मागणारे उमेदवार मात्र आता एक मत द्या, बाकी तुम्ही ठरवा. या मार्गाचा खुला अवलंब करताना दिसत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात मत विभाजन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुती व आघाडी यांची ताटातूट झाल्यानंतर सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे गण-गटांतील राजकीय पक्षांचे उमेदवार एकत्रितपणे फिरून प्रचार करताना आढळून येत आहेत. मात्र रविवारी प्रचाराचा अंतिम धमाका झाल्यावर अनेक उमेदवारांनी छुप्या तंत्राचा वापर करीत ‘एकला चलो रे’ ही भूमिका घेतली.

यासाठी प्रसंगी अन्य उमेदवारांचे साहाय्यदेखील घेण्यात येत आहे, तर कुठे जातीय समीकरणांचा आधार घेतला जाऊन एका मतासाठी जोगवा मागितला जात असल्याचे अंतिम क्षणातील चित्र आहे. यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन उमेदवारांमध्येदेखील अविश्वास खदखदत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)

मनीपॉवर ठरतोय प्रभावीगण-गटातील एकाच पक्षाचे उमेदवारांची आर्थिक कुवत मात्र सारखी नाही. त्यामुळे एकाच्या खर्चाचा भार दुसऱ्या उमेदवारांना सहन करावा लागतो. आतापर्यंत एकत्र फिरून मत मागणारे उमेदवार प्रचाराच्या अंतिम क्षणात मात्र सहकाऱ्याचा हात सोडताना दिसत आहे. किती दिवस खर्चाचा भार सोसायचा त्यापेक्षा स्वत: खर्च करून स्वत:साठी एक मागण्याकडे उमेदवारांचा कल दिसून येत आहे.