शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

म्यानमारचे रोहिंग्या मुस्लिम साखरी नाटेत आश्रयाला

By admin | Updated: October 21, 2015 00:10 IST

शोध मोहीम : ४३ नागरिक राहत असल्याचे निष्पन्न

जैतापूर : बौद्धधर्मीयांशी गेली २५ वर्षे सुरू असलेल्या वादामुळे म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिम समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत असून, त्यातील ४३ स्थलांतरित शरणार्थी रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील साखरी नाटे गावात आश्रयाला आले आहेत. गेल्या चार-पाच वर्षांत ते येथे दाखल झाले असून, मिळेल ते काम करून पोट भरत आहेत.सागरी मार्गाने होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेवर नाटे सागरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्यावतीने परदेशी व्यक्तींची शोधमोहीम सुरू केली आहे. त्यानुसार मंगळवारी दिवसभरात तब्बल ४३ परदेशी व्यक्ती नाटे परिसरात राहात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व व्यक्ती म्यानमारमधील असल्याचे पोलिसांनी सांगितले.साखरी नाटे भागात मोठ्या प्रमाणावर मच्छिमारीचा व्यवसाय चालतो. रत्नागिरी जिल्ह्यात उत्पन्नामध्ये साखरी नाटे बंदराचा दुसरा क्रमांक लागतो. बोटचालकांना खलाशांची निकड मोठ्या प्रमाणावर भासते. स्थानिक पातळीवर खलाशी मिळेनासे झाल्याने नेपाळ येथून खलाशी आणले जातात. सध्या या बंदरात साडेचारशे यांत्रिकी नौका आहेत. यावरील सुमारे अडीच हजार खलाशी हे नेपाळ येथील आहेत. काही गावांमध्ये हापूस कलमांच्या बागेत रखवालदार म्हणून नेपाळ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.खलाशी म्हणून आणल्यानंतर त्याची पूर्ण माहिती संबंधित बोट मालकाने बंदर खाते व पोलीस ठाण्याला देणे आवश्यक असते. मात्र तसे घडत नाही. त्यामुळे त्याचा फायदा घेत दहशतवादी समुद्रमार्गे घुसखोरी करू शकतात, हे लक्षात घेऊन परदेशी व्यक्तींची शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी साखरी नाटेत राबवण्यात आलेल्या या शोधमोहिमेत म्यानमार येथील ४३ व्यक्ती आढळल्या. हे लोक कोणामार्फत येथे आले, त्यांना आश्रय कोणी दिला, याचा तपास पोलीस करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे हे कर्मचाऱ्यांसह मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून ही शोध मोहीम राबवित आहेत. (वार्ताहर) कोण आहेत रोहिंग्या मुस्लिमम्यानमारमध्ये बौद्धधर्मीय बहुसंख्येने राहतात. तेथे रोहिंग्या मुस्लिम समाजाचे लोक अल्पसंख्य म्हणून राहतात. बौद्धधर्मीय त्यांना स्थानिक मानण्यास तयार नाहीत. त्यांच्यादृष्टीने रोहिंग्या मुस्लिम हे बंगाली आहेत आणि त्यांनी म्यानमारमध्ये बेकायदा स्थलांतर केले आहे. रोहिंग्या मुस्लिम समाजाच्या मते ते म्यानमारचे पूर्वरहिवासीच आहेत. १९९१पासूनच हा वाद सुरू आहे. अलीकडच्या काळात लष्कराकडून रोहिंग्या मुस्लिमांवर अत्याचार वाढू लागल्याने त्यांनी स्थलांतर सुरू केले आहे. यातीलच काही लोक साखरी नाटे येथे आले आहेत.मच्छिमारी बंदर बंदमंगळवारी नाटे बंदरात व परिसरात शोधमोहीम राबविण्यात आल्याने बंदरातील मच्छिमारी पूर्णपणे बंद होती. ही मोहीम यापुढेही सुरू ठेवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.शरणागतीसाठी अर्ज केल्याच्या पावत्याया परदेशी व्यक्तींपैकी काहीजणांकडे शरणार्थी म्हणून केंद्र सरकारचे ओळखपत्र उपलब्ध आहे, तर काहीजणांनी अशा ओळखपत्रासाठी अर्ज केल्याच्या पावत्या आहेत. त्यातील काहीजण २०११ पासून येथे रहात आहेत.