शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
4
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
5
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
6
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
7
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
8
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
9
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
10
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
11
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
12
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
13
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
14
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
15
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
16
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
17
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
18
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
19
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
20
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

रोहा पंचायत समितीवर सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच

By admin | Updated: February 27, 2017 02:56 IST

तालुका पंचायत समितीवर वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता असे.

मिलिंद अष्टिवकर,रोहा- तालुका पंचायत समितीवर वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता असे. यंदा मात्र राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात पक्षाची पिछेहाट झाली आहे. पंचायत समितीत एकहाती सत्ता गाजविणाऱ्या राष्ट्रवादीला यावर्षी ८ पैकी केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. मित्रपक्ष शेकापकडे १ जागा असल्याने पंचायत राज समितीत शेकापचा टेकू घेऊन राष्ट्रवादी पक्ष सत्तेवर पुन्हा एकदा विराजमान होणार आहे. अर्थातच पंचायत समितीत शेकापच्या खांद्यावर राष्ट्रवादीचे ओझे, अशीच काहीशी नामुष्की राष्ट्रवादी पक्षावर स्वत:च्याच बालेकिल्ल्यात ओढावली आहे. दुसरीकडे शिवसेना- काँग्रेस युतीदेखील सत्तेसाठी कुरघोडी करीत असल्याची चर्चा होत आहे. एकंदरीत सत्ताधारी राष्ट्रवादी, शेकाप व विरोधी पक्ष शिवसेना-काँग्रेस युतीत सत्ता स्थापनेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.रोहा पंचायत समिती सभापतींची जागा ओबीसी महिलांकरिता आरक्षित आहे. वरसे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीच्या राजश्री पोकळे व खांब गणातून वीणा चितळकर अशा निवडून आलेल्या दोन सदस्या सभापती पदाकरिता इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. सभापतीपदासाठी खऱ्या दावेदार असणाऱ्या राष्ट्रवादीच्या आंबेवाडी गणातील अर्पिता थिटे यांचा शिवसेनेच्या चेतना लोखंडे यांनी पराभव केला. शिवसेनेकडून चेतना लोखंडे या एकमेव उमेदवाराचे नाव आघाडीवर आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीकडे राजश्री पोकळे, विजया पाशिलकर, वीणा चितळकर, रामचंद्र सकपाळ असे चार सदस्य, तर गुलाब वाघमारे (शेकाप), चेतना लोखंडे (शिवसेना), संजय भोसले (शिवसेना), बिलाल कुरेशी (काँग्रेस) असे सदस्य असून सभापतीपदासाठी राजश्री पोकळे व वीणा चितळकर राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. आंबेवाडी गणातील अर्पिता थिटे यांचा पराभव यांच्यातील अंतर्गत गटबाजीमुळे झाल्याचे बोलले जात आहे.राष्ट्रवादीकडे चार सदस्य असून, शेकापच्या एक सदस्याचा आधार घेऊन राष्ट्रवादी सत्तेत बसणार आहे. अर्थातच संपूर्ण तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लावून अलिशान पाट्या उभ्या करून राष्ट्रवादीच्या पदरात अपेक्षित यश मिळाले नाही. म्हणूनच शेकापचा टेकू घेऊन राष्ट्रवादी सत्तेवर बसणार आहे. खुद्द प्रदेशाध्यक्षांच्या तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाला इतर पक्षांचा आधार घ्यावा लागत आहे, यापेक्षा दुर्दैव काय म्हणावे? असे खासगीत बोलले जात आहे. जिल्हा परिषदेपाठोपाठ पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचे मताधिक्य घसरल्याने भविष्यात राष्ट्रवादीला धोक्याची घंटा दिसत आहे. भाऊबंधकीत अडकलेल्या प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांना पक्षाची ताकद टिकविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागतआहे.>रोहा पंचायत समिती सभापतींची जागा ओबीसी महिलांकरिता आरक्षित आहे. वरसे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीच्या राजश्री पोकळे व खांब गणातून वीणा चितळकर अशा निवडून आलेल्या दोन सदस्या सभापती पदाकरिता इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.शेकापचा टेकू घेऊन राष्ट्रवादी सत्तेवर बसणार आहे. खुद्द प्रदेशाध्यक्षांच्या तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाला इतर पक्षांचा आधार घ्यावा लागत आहे असे बोलले जात आहे. जिल्हा परिषदेपाठोपाठ पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचे मताधिक्य घसरल्याने भविष्यात राष्ट्रवादीला धोक्याची घंटा दिसत आहे. भाऊबंधकीत अडकलेल्या प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.युतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे नेते मारु ती देवरे, युतीच्या उमेदवाराला आपल्या घरच्या केंद्रात मताधिक्य मिळवून देण्यात कमी पडले असून याठिकाणी शेकाप- राष्ट्रवादी आघाडीने ९२ मतांची आघाडी घेतली असल्याने यामागचे नक्की गणित तरी काय, अशी चर्चा रंगू लागली आहे. ऐनघर ग्रा. पं. आकारमानाने मोठी असून त्यात ऐनघरसह हेदवली, तामसोली, सुकेळी, बाळसई अशी ६ मतदान केंद्रे येतात. यात सेनेचे भोसले यांना ऐनघर, हेदवली, सुकेळी १-२ चार केंद्रांत मिळालेली ५९९ मतांची महत्त्वपूर्ण आघाडी त्यांना विजयाच्या सीमेवर घेऊन गेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तामसोली आणि बाळसई या दोन केंद्रांत शेकापचे भालचंद्र शिर्के फक्त ७३ मतांचीच आघाडी मिळवू शकल्याचे स्पष्ट झाले आहे.