शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

राज्यात आता रोबोट करणार मॅनहोलची सफाई, २७ महापालिकांसाठी १०० रोबोट

By दीपक भातुसे | Updated: April 17, 2025 11:59 IST

सफाई कर्मचाऱ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकार २७ महापालिकांसाठी १०० रोबोट खरेदी करणार आहे.

- दीपक भातुसे, मुंबई मॅनहोलची सफाई करताना सफाई कामगारांचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी यापुढे रोबोटद्वारे मॅनहोल सफाई होणार असून त्यासाठी राज्य सरकार १०० रोबोटची खरेदी करणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती यासारख्या महापालिकांसाठी ही रोबोट खरेदी केली जाणार आहे.  

देशभर अनेक शहरांत सफाई कामगारांना प्रत्यक्ष मॅनहोलमध्ये उतरवून सफाई केली जाते. राज्यात झालेल्या ८१ मृत्यूंची गंभीर दखल घेत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने अशा कामांचे सामाजिक लेखापरीक्षण केले होते आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची दखल घेण्यात अपयशी ठरल्याबद्दल राज्य सरकारवर ताशेरेही ओढले होते. त्यामुळे मॅनहोलच्या सफाईसाठी रोबोट खरेदी करण्याचा प्रस्ताव समोर आला असून राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने यात पुढाकार घेतला आहे.

आतापर्यंत ८१ सफाई कामगारांचा मृत्यू 

राज्यात मॅनहोल सफाई करताना आतापर्यंत ८१ सफाई कामगारांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ११ मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील, १२ ठाणे जिल्ह्यातील, ७ पालघर जिल्ह्यातील आणि २ रायगड जिल्ह्यातील सफाई कामगारांचा समावेश होता. 

छत्रपती संभाजीनगरात एक महिना चाचणी  

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आम्ही प्रथम छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नवीन रोबोटची एक महिन्याची चाचणी घेणार आहोत. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर आम्ही १०० रोबोट खरेदी करणार असून ते राज्यातील २७ महापालिकांमध्ये दिले जातील.  केरळसारख्या राज्यात अशा प्रकारचे रोबोट आधीच वापरले जात असल्याचे शिरसाट म्हणाले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या दोन रोबोट वापरले जात आहेत, मात्र त्यांची क्षमता कमी आहे. आम्ही जे नवीन रोबोट खरेदी करणार आहोत. त्यांची कचरा साफ करण्याची आणि तो वेगळे करण्याची क्षमता जास्त आहे.-संजय शिरसाट, सामाजिक न्यायमंत्री    

टॅग्स :RobotरोबोटMaharashtraमहाराष्ट्रtechnologyतंत्रज्ञानState Governmentराज्य सरकार