शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उपसरपंच निघाला दरोडेखोर

By admin | Updated: June 21, 2016 03:51 IST

संकटकाळात गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा, ग्रामीण निवडणुकीत पॅनल उभे करणारा एक गावपुढारी यवतमाळातील दरोडेखोरांच्या टोळीचा मास्टर मार्इंड निघाला आहे.

यवतमाळ : संकटकाळात गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा, ग्रामीण निवडणुकीत पॅनल उभे करणारा एक गावपुढारी यवतमाळातील दरोडेखोरांच्या टोळीचा मास्टर मार्इंड निघाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या या कृत्याचा पर्दाफाश केला. विशेष म्हणजे, पुणे आणि हैदराबादमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पुढे आल्याने यवतमाळ पोलिसांनी तपासाची दिशा पुण्यावर केंद्रीत केली आहे. संजय विठ्ठलप्रसाद मिश्रा ऊर्फ पंडित मिश्रा (४२) असे या गावपुढाऱ्याचे नाव आहे. पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत काळीदौलत सर्कलमधील कान्हा (ता. महागाव) या गावचा तो उपसरपंच आहे. यवतमाळात २३ जानेवारी रोजी गजबजलेल्या दारव्हा रोडवरील सतीश फाटक यांच्या घरी भरदुपारी पडलेल्या दरोड्याचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. आठ दरोडेखोरांपैकी सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीन रिव्हॉल्वर, ११ राऊंड, सात मोबाईल, खंजीर व अन्य साहित्य जप्त करण्यात आले.संजय मिश्रा हा या टोळीचा मास्टर मार्इंड असल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली. त्याने अलिकडेच ग्रामपंचायत निवडणुकीत आपले पॅनल उतरविले होते. मात्र त्याच्यावर पुणे आयुक्तालयातसुद्धा दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले जाते. तसेच चार वर्षांपूर्वी हैदराबाद येथेही दरोड्याच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली होती. पोलिसांनी या गुन्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. (प्रतिनिधी)