शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
6
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
7
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
8
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
9
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
10
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
13
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
14
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
15
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
16
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
17
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
18
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
19
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
20
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे

मराठा मूकमोर्चाची गर्जना हृदय छेदून गेली- फडवणीस

By admin | Updated: October 7, 2016 19:42 IST

मराठ्यांनी मुकमोर्चे शांततेत, शिस्तीत काढले. मात्र त्याची महागर्जना आमच्या कानीच पोहोचली नाही तर हृदय छेदून गेली. कोपर्डी घटनेतील नराधमांना

ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि.07 -  मराठ्यांनी मुकमोर्चे शांततेत, शिस्तीत काढले. मात्र त्याची महागर्जना आमच्या कानीच पोहोचली नाही तर हृदय छेदून गेली. कोपर्डी घटनेतील नराधमांना फाशी व मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार सक्षमपणे प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हिंगोली येथे भाजपतर्फे आयोजित शेतकरी व बचत गट मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दिलीप कांबळे, खा. बंडू जाधव, आ.तुषार राठोड, आ. तान्हाजी मुटकुळे, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, माजी खा. सुभाष वानखेडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मराठा समाजाचे मुकमोर्चे काही राजकीय नाहीत. एवढी विक्रमी मोर्चे काढणे कुणालाही शक्य नाही. हा समाजाचा आक्रोश आहे. आरक्षण देण्याचीच आमची भूमिका आहे. त्यासाठी सक्षम वकील लावले. आतापर्यंत सत्तेत असणाºयांनी कायदेशीर प्रक्रिया न करता लोकसभेच्या निवडणुकीनंतर पायाखालची वाळू घसरल्याने हा निर्णय घेतला. त्यामुळे प्रकरण न्यायालयात गेले. मात्र आम्ही आरक्षणासाठी कायदा केला. आता सक्षमपणे ही बाजू मांडू. आरक्षणच नव्हे, तर कोपर्डीच्या आक्रोशातही काही मंडळी राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांना ती सवयच आहे. मात्र त्यांना त्यांची जागा दाखवा. आरक्षणात शासकीय संस्थांच्या ६ हजारपैकी ९00 जागाच मराठा मुलांना मिळतील. मात्र १.४५ लाख जागा या खाजगी कॉलेजात भरल्या जातात. तेथे किती मराठ्यांना मोफत प्रवेश मिळाला? असा सवाल त्यांनी केला. मात्र उच्च शिक्षणासाठी आता शासन खर्च करेल, असे ते म्हणाले.
तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत ५ लाख जणांना रोजगार संधी उपलब्ध करून देवू. तर  सिंचनक्षेत्र वाढीसाठी सरकार नियोजन करीत असून ९५ हजार कोटींचा निधी उभारून विविध प्रकल्प मार्गी लावले जातील, असेही ते म्हणाले. तर जगातील सर्वात मोठा राजा छञपती शिवाजी महाराजांचे स्मारकही तेवढेच मोठे उभारले जाईल, असे ते म्हणाले.
यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी वीज व पाणीप्रश्न सोडला तर शेतकरी कुणाच्याही दारी भीक मागणार नाही. हे दोन्ही प्रश्न सोडविण्यासाठी आमचे सरकार काम करीत आहे. ९५ हजार कोटींची कामे करायची आहेत. त्यासाठी नाबार्डकडून ६ टक्के व्याजाने १६८00 कोटी, केंद्राचे १५ हजार कोेटी व उर्वरित राज्य शासन नियमित तरतूद करणार आहे. तर हिंगोलीचा १७00 कोटी रुपयांचा अनुशेष निघत असून तो राज्यपालांच्या मंजुरीनंतर तीन वर्षांत भरून काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या काळातील विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमास शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.  
 
उच्च शिक्षण, आरोग्यसेवा विनामूल्य करू
फडणवीस म्हणाले, आगामी काळात शेतकरी व गोरगरिबांना १२00 आजारांवर विनामूल्य उपचारासाठी म.फुले जनारोग्य योजना आखली आहे. यासाठी काही उद्योगपती व सेवाभावी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. तर सध्या ७५0 स्मार्ट गावे केली असून २0१८ पर्यंत २९ हजार गावांपर्यंत हा लाभ पोहोचवू. त्यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटीद्वारे शहरी शिक्षण व आरोग्य सेवांचा लाभ ग्रामीण भागात मिळेल. एवढेच नव्हे, तर उच्च शिक्षणासाठी शेतकºयांच्या मुलाचा खर्च शासन करेल, असेही ते म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेत सहा हजार गावे दुष्काळमुक्त झाली. २0१९ पर्यंत २0 हजार गावे दुष्काळमुक्त होतील, असेही फडणवीस म्हणाले. कौशल्या विकासात कृषीपूर उद्योगांचे प्रशिक्षण अन् अण्णासाहेब आर्थिक महामंडळामार्फत ५ लाख जणांना कर्जपुरवठा करणार असल्याचेही सांगितले.